शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचा राम राम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 06:22 IST

‘प्रभू श्रीराम’ प्रत्येक भारतीयाच्या तनामनात व्यापून राहिलाय.

-  शैलजा शेवडे

राम म्हणा विश्वासाने, अनुदिनी, श्वास घेता,काय विश्वास श्वासाचा, पुन्हा येईल तो घेता..।

‘प्रभू श्रीराम’ प्रत्येक भारतीयाच्या तनामनात व्यापून राहिलाय. ‘राम’ शब्द असलेले किती वाक्प्रचार, शब्दसमूह आपण सहजपणे वापरतो. आपण एकमेकांना भेटलो की ‘राम राम’ म्हणतो. सकाळच्या पहिल्या, प्रसन्न प्रहराला आपण ‘रामप्रहर’ म्हणतो.भरपूर कामं असतील, तर ‘रामरगाडा’ म्हणतो.एखाद्या गोष्टीत काही अर्थ राहिला नसेल, तर ‘त्यात काही राम नाही’ असं म्हणतो.व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीने ‘राम म्हणलं’असं म्हणतो.खारीच्या पाठीवरच्या पट्ट्यांना आपण ‘रामाची बोटं’ म्हणतो.मुंगूस दिसला आणि आपण त्याला ‘रामाची शपथ’ घातली, तर तो आपल्याला तोंड दाखवतो, अशी आपली श्रद्धा असते.एखाद्या गोष्टीला बाकी कुणी साक्षीदार नसला तरी ‘राम’ सर्वसाक्षी आहे, त्याला माहीत आहे, या भावनेने ‘राम जाणे’ असं सहजपणे म्हणतो.‘हे राम’ हा आपला सहजोद्गार असतो.हिंदीत ‘रामभरोसे’ हा शब्द वापरतात.कधी आपण ‘रामा, शिवा, गोविंदा..’ असं म्हणतो.का बरे श्रीराम आपलेदैवत आहे...राम नाम हे अंतर्यामी, जपणे अवगत आहे,जीवन म्हणजे भक्तीयोग हा, माथा अवनत आहे ।तरीही ‘राम’ या शब्दावरून एवढे वाद का होतात...‘राम’ जाणून घ्या हो...!नको शंका मनी, नको फुका वाद,श्रीरामाला साद, मनोभावे ।अयोध्यापती तो, आहे क्षमाशील,तारून जाशील, भवसिंधु ।शबरीची उष्टी, चाखली ती बोरे,ठेवील का तो रे, हीनभाव ?जानकीचा राम, जाणुनीया घ्यावा,मुखी येऊ द्यावा, निरंतर ।असे सर्वांवरी, कृपादृष्टी ज्याची,खात्री ठेव त्याची, रक्षिल तो ।पतित पावन, राम आहे माझाराम आहे तुझा, प्रत्येकाचा ।चार दिन जिणे, कशाला विवाद,प्रेमाचा संवाद, राम राम ।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक