शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

परमभक्ताची इच्छा पूर्ण करतो परमेश्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 04:08 IST

भगवंत प्रसन्न झाला की, आपल्या परमभक्ताच्या सर्वच इच्छा पूर्ण करतो.

भगवंतांच्या अतिभव्य विराट रूपात अर्जुनाला भगवंतांनी आपले मूळचे श्री विष्णूरूप दाखविले होते. परंतु सर्वपक्षी काळाचे, मनाचा थरकाप उडविणारे भगवंतांचे भव्य स्वरूप अर्जुनाला सहन झाले नव्हते. भगवंतांनी आपल्या परमभक्ताची ही इच्छासुद्धा पुन्हा पूर्ण करून आपले कृष्णरूप प्रकट केले होते. भगवंत प्रसन्न झाला की, आपल्या परमभक्ताच्या सर्वच इच्छा पूर्ण करतो. त्याचे दर्शन अकराव्या अध्यायात दिसते़ भक्तश्रेष्ठ अर्जुनाने भगवंतांचे गोडगोडुले सुंदर असे रूप प्रत्यक्ष अनुभवले होते आणि विश्वरूपदर्शन, प्रसंगी अतिभव्य विराट स्वरूपसुद्धा अनुभवले होते़ अर्जुन हा सर्वात श्रेष्ठ असा भाग्यवान परमभक्त होता़ भगवंतांनी तर ज्ञानयोग्याची श्रेष्ठता अर्जुनापुढे निर्गुण निराकार परमेश्वराच्या उपासनेचे महत्त्व विषद करून सांगितले होते़ अर्जुनापुढे त्यामुळे एक नवेच प्रश्नचिन्ह उभे राहिले की, सगुण साकार परमेश्वराची उपासना करणे इष्ट की, ज्ञानयोगाला अभिप्रेत असलेल्या निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना करावी आणि या दोन्ही उपासनांमधील श्रेष्ठ उपासना कोणती? तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणाले,मय्यावेश्यपनो ये मां नित्ययुक्ता उपासने।श्रद्धया परयोपेतास्ते मे युकदतमा मना: ।।माझ्यात तल्लीन होऊन मन:पूर्वक माझ्याच भजन पूजनात अष्टौप्रहर दंग असतो़, तोच खरा सर्वश्रेष्ठ योगी पुरुष असतो़ तो परमभक्त असतो़ तो परमभक्त मला अत्यंत प्रिय असतो़ थोडक्यात सांगायचे झाले, तर माझ्या सत्य स्वरूपात सर्वांगाने तल्लीन होऊन, माझ्यात मग्न होऊन, परमश्रद्धेने माझ्या सगुण साकार रूपाची जो उपासना करतो, तोच श्रेष्ठ योगी पुरुष असतो़ भगवंत अस्तित्वाची एकदा का मन बुद्धीने एकाग्र झाले की, समाधीपर्यंत हा माझा परमभक्त सहजपणे पोहोचतो, एवढे तू ध्यानात घे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक