शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांची पत्रे : सगुणभक्तीचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:54 IST

आपण सगुण देवाचे चरित्र का थोर मानावे म्हणता? कारण देव तर निर्गुण आहे म्हणतात. तो दिसत नाही म्हणतात. मग त्या सगुण देवाची पूजा निर्गुण देवाला मानवते का? याचे उत्तर मी पत्राद्वारे कळवीत आहे.

  • बाबा मोहोड

प्रिय मित्र -आपण सगुण देवाचे चरित्र का थोर मानावे म्हणता? कारण देव तर निर्गुण आहे म्हणतात. तो दिसत नाही म्हणतात. मग त्या सगुण देवाची पूजा निर्गुण देवाला मानवते का? याचे उत्तर मी पत्राद्वारे कळवीत आहे. मित्रा, समाजाचे हित, दलित, गरीब, अज्ञानी यांना उन्नत करण्यासाठी ज्यांची अहोरात्र धडपड चाललेली असते व भाविकांच्या या श्रद्धेला फळाफुलानेही प्रसन्न होऊन जो त्याच्या हृदयाचे बोल ओळखतो व त्याच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करून रानावनात जाणे पत्करतो, गरीब किसानाची मुले शाळेत जात नव्हती व त्यांना समाजधर्माचे यथार्थ ज्ञान नव्हते म्हणून गाईगुरे चारण्याचे निमित्त करून ब्रह्मज्ञान देतो व धर्म स्थापनेसाठी म्हणजे अन्यायाच्या प्रतिकाराची शक्ती निर्माण करण्याकरिता ज्याने आपले जीवन पणाला लावले आहे अशा मानवांनाच आम्ही सगुणदेव मानले आहे व असाच पुरुष देवत्व प्राप्त करू शकतो, अशी आमची धारणा आहे. म्हणून ज्या कुणी असे जीवन घालविले असेल ते सर्व आमचे देव झाले आहेत. हीच आमची सगुण देवाची व्याख्या आम्ही केलेली आहे. अशांचे चरित्र पवित्र भावनेने वाचून आपणही त्यांचे वाटेकरी होऊ या. मनाला असे संस्कार देण्याकरिताच आपण देवळात जावे आणि त्या पाषाण मूर्तीकडे प्रेमळ नेत्राने, अष्ट-सात्विक भावाने बघावे. म्हणून मी तुम्हाला सगुण-भक्ती सांगत असतो. पाषाण पूजण्यासाठी नव्हे तर ज्यांनी मानवजातीवर उपकार केले त्यांचे स्मृतिचिन्ह पाहून आपल्यालाही तोच छंद लागावा व आपल्या हातूनही असे देवप्रिय कार्य घडावे, हाच त्याचा उद्देश आहे. एरव्ही निर्गुण देवाला आपण कसे जाणणार? कारण जाणणे हे सुद्धा निर्गुणाचा विषय होऊ शकत नाही. संत म्हणतात, ‘जाणीव नेणीव भगवती नाही’ यावरून निर्गुणाची वाचिक संगती लावता येते व एवढा वृत्तीचा सूक्ष्मपणा ज्यांना अनुभवता येतो त्यांनी खुशाल निर्गुणाचा मार्ग चोखाळावा. पण तुमच्यासारख्या भाविकांनी त्यात पडू नये. खुशाल देवळात जावे. नाम घ्यावे. चिंतन करावे व पवित्र कार्याला लागावे. हेच जरी आपणाला साधले तरी आपण देवाच्या प्रीतीला पात्र होऊ शकतो. म्हणूनच मी सगुण देवाचे भजन महान आहे, असे आपणास सांगितले आहे.                                                                                                                                                 - तुकड्यादास

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAdhyatmikआध्यात्मिक