शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - ब्रह्मांडव्यापी स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 06:16 IST

वामनराव देशपांडे    ‘विश्वरूपदर्शन’ अध्यायात भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला ब्रह्मांडव्यापी स्वरूपाचे दर्शन घडवून चराचरात परमेश्वरी अस्तित्व नांदत आहे, हे पाहण्याची ...

वामनराव देशपांडे   ‘विश्वरूपदर्शन’ अध्यायात भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला ब्रह्मांडव्यापी स्वरूपाचे दर्शन घडवून चराचरात परमेश्वरी अस्तित्व नांदत आहे, हे पाहण्याची दिव्यदृष्टी दिली. याचा सोपा अर्थ असा की, या भाग्यशाली मानवी योनीलाच भगवंत अस्तित्वाचे अखंड चिंतन करता येते आणि ती जी भगवंतकृपेने दिव्यदृष्टी लाभली आहे त्याच्या साहाय्याने भगवंत अस्तित्वाला प्रत्यक्ष पाहता येते. हे भाग्य इतर योनींना नाही. म्हणून माणसाने चिंतनशील मनाच्या साहाय्याने भगवंतांचे नित्य स्मरण करीत, फक्त भगवंतांचाच ध्यास घेत, प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने, भगवंतांचे चतुर्भुज रूप आणि दिव्य परमेश्वरी स्वरूप अनुभवण्याचा ध्यास घ्यावा हा दिव्य संदेश, भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला गीतेमधल्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायातून दिला आहे. भगवंतांनी अर्जुनाला आपले विराट स्वरूप दाखवले तेव्हा खरे तर अर्जुन भांबावून गेला होता. भगवंतांचे हे विराट स्वरूप पाहिल्यावर भेदरलेल्या अर्जुनाने आपले दोन्ही हात जोडून भगवंतांना प्रार्थना केली होती की,अह्ष्टपूर्व हषितोजस्मि ज़ष्टवा भयेन प्रव्यथिते मनो मे।तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास ।।

भगवंता, जे तुझे ब्रह्मांडस्वरूप पूर्वी मी कधीही पाहिले नव्हते, ते अवघ्या त्रैलोक्याला व्यापून पुन्हा दशांगुळे उरणारे भव्य स्वरूप पाहून मला निश्चितच हर्ष होतो आहे, परंतु तरीही मी भीतीने माझे अवघे हे मर्त्य अस्तित्व गारठून गेले आहे. माझे मन तुझे अक्राळविक्राळ भव्य रूप पाहताना व्यथित झाले आहे. मला आजपर्यंत जे तुझे शांत विष्णुरूपच पाहण्याची सवय झाली आहे ना, तेच पूर्वीचे तुमचे शांत देवरूप पुन्हा प्रकट करावे, अशी मी तुम्हाला विनंती करतो. भगवंता आपण मजवर प्रसन्न होऊन माझ्या रथावर जसे माझे रक्षण करण्यासाठी बसला होतात तसे मला माझे रक्षणकर्ते भगवंत म्हणून हवे आहात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक