शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विरहातच कळते खऱ्या प्रेमाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:55 IST

नदी ज्या प्रमाणे सर्वस्वी समुद्राला जाऊन मिळते व सागर रूप बनते. तसा परम प्रेमाने भक्त भगवंतालाच जाऊन मिळतो.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी ( बीड )  

परमेश्वर हा परम प्रेमाचा विषय आहे. प्रेम आणि परम प्रेम यात जमीन व आकाश इतके अंतर आहे. संसारातील प्रेमात घृणा, तिरस्कार, द्वेष इ.विकार निर्माण होऊ शकतात. संसारातील विषय हे अनित्य व दु:ख रूपच असतात. परमेश्वर मात्र सद् चिद् आनंद रूपच असतो. त्याच्या दर्शनापुढे कोणताही सर्व श्रेष्ठ आनंद नाही. संत निळोबाराय म्हणतात :--नित्यानंदापुढे आनंद तो कोण! विषय सुख बाई बापुडे तो शिन !!फक्त या आनंदाची अनुभूती येण्यासाठी देव आणि भक्त यांचे तादात्म्य होणे गरजेचे आहे. देव आणि भक्त एक रूप व्हायला हवेत. मंडळी, प्रेम अनन्य शरणागती, निर्माण झाल्याशिवाय परमेश्वराविषयी परम प्रेम निर्माण होणार नाही. मग संसारातील यच्चयावत विषय तुच्छ वाटतील. माऊली विरहिणीच्या अवस्थेत स्वानुभव प्रगट करतात. कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करितो गे माये

न लावा चंदनु न घाला   विंझणवारा,हरिविणे शून्य शेजारूं गे माये चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगे भेटवा का मंडळी, नदी ज्या प्रमाणे सर्वस्वी समुद्राला जाऊन मिळते व सागर रूप बनते. तसा परम प्रेमाने भक्त भगवंतालाच जाऊन मिळतो. मीठ जसे पाण्यात पडल्यावर मीठ रूपाने वेगळे उरतच नाही. अगदी तसेच. ...!संत म्हणतात, जळी पडलिया लवना ! सर्व ही जळ होय विचक्षणा !!माऊलीच्या या विरहिणीत आर्तता, व्याकुळता, सामावलेली आहे. प्रेम म्हटल की विरह हा आलाच. विरहाच्या वेळीच माणसाच्या खऱ्या प्रेमाची कसोटी कळते. आपल्या आवडत्या प्रियतमाची वाट बघण्यात, त्याच्या विरहाने व्याकुळ होण्यात देखील एक विलक्षण आनंद असतो. भगवंतावर प्रेम करणारी विरहिणी  म्हणते,कृष्णे विंधिंली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करितो गे माये!! अगं सखे जरा खिडकी लावतेस का. ..? ती म्हणते का गं. .? विरहिणी म्हणते, मला चंद्रमा उबारा करतो गं....सखी म्हणते, थांब मी तुझ्या अंगाला चंदन लावते. विरहिणी म्हणते, न लावा चंदनु न घाला विंझनवारा. अग मला श्रीहरि वाचून सगळे शून्यवत वाटत गं...! मी त्या भगवंताची कधीची वाट बघत आहे. माझ्या विरहाचा मदन मला आता जाळत आहे. माझ्या अंगातली चंदनाची चोळी मला तापलेल्या तव्यासारखी पोळत आहे. मला लवकरात लवकर त्या वनमाळीला भेटवा. माऊलीची ही विरहिणी चितेवर जळणाऱ्या सतीप्रमाणे आहे. भक्तीची उच्चतम अवस्था या विरहिणीत सामावलेली आहे. 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.त्यांचा भ्रमणध्वनी  8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक