शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

श्राद्धाला लागणा-या सामग्रीचे हे आहे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 08:01 IST

ज्या पितरांनी कष्ट सोसून आपल्याला वाढवले त्या पितरांचे ऋण काही अंशी फेडण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष.

ज्या पितरांनी कष्ट सोसून आपल्याला वाढवले त्या पितरांचे ऋण काही अंशी फेडण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष. या काळात करण्यात येणारे श्राद्ध मन:पूर्वक श्रद्धेने व यथासांग करावे, असे शास्त्र सांगते. त्यात लागणा-या साहित्याची यादी व त्यांचे महत्त्व खूप मोठे आहे. ती बहुतेकांना माहीत असते. त्यामुळे त्यापैकी काहींची माहिती आज घेऊ या.

१) पवित्रके :

पवित्रके दोन अथवा तीन दर्भांची केली असता चालतात. ते तयार करण्याचीही खास पद्धत असते. ती जाणकाराकडून माहीत करून घ्यावी लागते. श्राद्धाचे वेळी अथवा शांतिकर्माचे वेळी तीन-दोन दर्भांचे पवित्रक करावे. सपिंडक श्राद्धात दोनदा पवित्रके धारण करावी लागतात.

२) कूर्च :

श्राद्धप्रसंगी पितरांना उदक समर्पण करण्यासाठी दर्भापासून तयार केलेले साधन म्हणजे कूर्च होय. पहिल्या वर्षश्राद्धाला पाच दर्भांचाकूर्च करतात. पुढे प्रतिसांवत्सरिक श्राद्धाला सात दर्भांचा कूर्च करतात. महालय श्राद्ध व तीर्थ श्राद्ध यामध्ये नऊ दर्भांचा कूर्च करतात. देवांचे कूर्च दोन दर्भांचे असतात. पहिल्या वर्षी चार दर्भांचेही कूर्च करण्याची काही ठिकाणी पद्धत आहे.

३) ब्राह्मण :

श्राद्धात भोजनाला दोन, चार किंवा जास्तीत जास्त पाच ब्राह्मण असावेत. देवस्थानीय ब्राह्मणांचे तोंड पूर्वेस व पितृस्थानीयब्राह्मणांचे तोंड उत्तरेस होईल, असे त्यांना बसवावे. ब्राह्मण दोन असल्यास एक देवस्थानी व एक पितृस्थानी बसवावा. तसेच पाच असल्यास दोन देवस्थानी व तीन पितृस्थानी बसवावेत.

४) पिंड :

भातामध्ये तिलोदकाचे पाणी, वडा व खीर घालून, भात मळून साधारणत: लिंबाएवढे गोल असे पिंड करावेत. ते मध्येच फुटतील असे करू नयेत. चांगले घट्ट करावेत. त्यातही पितृत्रयींकरिता जरा मोठे पिंड करण्याची पद्धत आहे. ती कृतज्ञतामूलक आहे. वस्तुत: पिंडाकरिता सर्व अन्नातील थोडा-थोडा भाग घ्यावा, असे शास्त्र सांगते. तरीही आपापल्या भागातील रूढीप्रमाणे करावे.प्रतिसांवत्सरिक श्राद्धात तीन पिंड असतात. तर पितृपक्षात करणा-या येणा-या श्राद्धात मरण पावलेल्या पितरांचे पिंड करण्यात येतात.

५) तीळ :

काही ठिकाणी काळे तीळच श्राद्धाला वापरतात तर काही ठिकाणी पांढरे तीळही वापरतात. आपापल्या प्रदेशानुसार ते वापरावेत. हे तीळ नांगरताना सिद्ध केलेल्या भूमीमध्ये उत्पन्न केले असतील, तर अधिक चांगले.

६) तीलोदक-यवोदक :

श्राद्धसमयी तिलोदक अथवा यवोदक अर्पण करण्यात येतात. ते दोन स्वतंत्र ताम्हणात तयार करावेत. ते तयार करताना प्रत्येक ताम्हणात पाणी, तीळ किंवा यव, गंध, तुलसीपत्र, पुष्प, सुपारी, पैसा टाकावेत.त्यात कूर्च ठेवावे.

७) फुले :

श्राद्धासाठी शक्यतो पांढºया फुलांची योजना करावी. तांबडी कमळे असल्यास हरकत नाही. सुवासिक व सुंदर फुले केव्हाही चांगलीच वाटतात. त्या-त्या काळात उपलब्ध होणारी फुले विशेष चांगली. जास्वंदी, कोरांटी, वास नसणारी किंवा उग्र वासाची फुले घेऊ नयेत.

८) धूप :

चंदन, गुगुळ, सुगंधी उदबत्त्या लावाव्यात.९) मध :

पितरांना मध अतिशय प्रिय असल्याने मध आणून ठेवावा. 

-संकलन : सुमंत अयाचित

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक