शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘मी’पणाचा गर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:55 IST

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो.

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो. त्यांना कधी मन:शांती लाभत नाही. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे चार सॉप्टवेअर निसर्ग मानवाच्या जन्मासोबतच देऊन पाठवतो. जो त्याचा कुशलतेने, नियमांना धरून उपयोग करतो त्याचं आयुष्य कायमच सुखद घटनांनी भरलेलं असतं. मनाची चंचलता नष्ट करून मनाला स्थिर अवस्थेला आणून प्रज्ञेच्या उत्पत्तीचा पूर्ण लाभ होतो. बुद्धीची क्षमता जाणून घेऊन कर्माला बुद्धीवादाची जोड देतो आणि स्वाभिमानाची (अहंकार) पताका फडकत ठेवतो तिथे चित्त एकाग्र करून भावभावनांची, व्यवहार कुशलतेची, मानसन्मानाची, योग्य निर्णयाची पावले उचलून जगापुढे एक आदर्शव्रती म्हणून ओळखला जातो. बुद्धीच्या अफाट क्षमतेची आभा निर्माण करतो.

परंतु ज्याच्या ठायी ‘मी’पणाचा खोटा भाव जपलेला असतो तिथे प्रगतीच्या विटा ढासळायला सुरुवात होते. ‘मी’पणा म्हणजे खोटा गर्व, ‘मी’पणा म्हणजे मूळ तत्त्वाशी प्रतारणा, ‘मी’पणा म्हणजे स्वैराचार, दुराचार अशांच्या ठायी आत्मोन्नती होण्याची शक्यताच नसते. या वृत्तीची माणसं जिथे असतात तिथे प्रगतीची गती थांबलेली असते. त्याचं उदाहरण देण्यासाठीच रामायणातला रावण आणि महाभारतातले कौरव नियतीने कथारूपाने जगापुढे आणले आहेत. रावणाला आपल्या शक्तीचा, ऐश्वर्याचा गर्व झाला होता. तो स्वत:च्या प्रेमात आंधळा झाला होता म्हणून त्याने सात्त्विक अशा देवपत्नीचं अपहरण केलं. स्वत:च्या भावाने त्याची समजूत घालण्याची पराकाष्टा केली; परंतु ‘मी’पणाच्या हट्टामुळे तो मृत्यूच्या जाळ्यात अडकतच गेला. पांडवांच्या वनवासाला कारणीभूत ठरणारे कौरवही ‘मी’पणाच्या हट्टामुळे शेवटी मृत्युपंथाला लागले. कुटुंब असो, गाव असो वा राष्टÑ, जिथे मूळ तत्त्वाला सोडून तामसी वृत्तीच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न अट्टाहासाने होतो, निसर्ग शेवटी हा त्याला कायमची अद्दल घडवितोच, त्या त्या व्यक्तीचं, गावाचं, राष्टÑाचं नशीब कालांतराने काळंवडून जातं. अनेक पातळ्यांवर त्यांचा पराभव झालेला असतो. कायमच ते मनस्तापाला तोंड देत राहतात. त्यांच्या ठायी प्रगतीची कुठलीही बाजू शिल्लक राहत नाही. सन्मानाच्या मार्गावर नेहमीच परमेश्वराच्या हजारो, लाखो सात्त्विक हातांचा आधार मिळत जातो. प

रंतु ‘मी’पणाच्या हेकट मार्गावर तामसी प्रवृत्तीचीच माणसे कायम भेटत राहतात. आणि ही आधारहिन माणसेच शेवटी विनाशकाले सर्वांना घेऊन जातात. आजही काही गावे, शहरे अशी आहेत की त्यांची प्रगती कुठल्याही बाजूने उदयाला येत नाही. भयंकर आणि भकास दिसणारी गावे किंवा शहरे ‘मी’पणाच्या चक्रव्यूहात अडकलेली असतात. एखाद्या प्रगतशील शहरातील सत्यपूर्ण व्यावहारिक जागृतीमुळे तेथे प्रभावीपणे प्रगतीची पावले उचलताना दिसतात. तर काही काही शहरे मात्र कायम मूलतत्त्वाची पायमल्ली करताना लक्षात येत राहते. मुळातच सात्त्विक प्रवृत्तीचे जागरण ज्या ठिकाणी असते तिथे फुलांचीच बाग फुललेली असते आणि जिथे तामसी प्रवृत्तीचेच प्रदर्शन होत राहते तिथे अराजकतेचे रान कायमच माजलेले दिसते. कलह माजलेला आपल्याला पाहावयास मिळते. शिक्षण, संस्कार, प्रगत विचार, सामर्थ्यशाली कृती यांचा कलश जिथे पुजला जातो तिथेच वैभव उजळून निघते.- विजयराज बोधनकर