शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

अज्ञानाच्या आवरणामुळे देवजवळ असूनही कळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:53 IST

देव तर ह्रदयातच आहे

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

देव आहे का..?स्वामी विवेकानंदांनी एकदा परमहंसांना विचारले, गुरूदेव..! देव या जगात आहे का.? असलाच तर तो कुठे असेल..? रामकृष्णांनी उत्तर दिले - आपल्या जवळ... अगदी अंतर्यामि.. संत म्हणतात,देव जवळी अंतरी ! भेटी नाही जन्मभर !!मग गुरु देव तो जर इतका जवळ असेल तर दिसत का नाही..? भेटत का नाही..? रामकृष्ण म्हणाले,आगपेटीतल्या प्रत्येक काडीत अग्नी असतो पण नरेंद्रा, तो दिसतो का रे..? फुलातल्या प्रत्येक कळीत सुगंध दडलेला असतो पण तो दिसतो का..? प्रत्येक बीजात वृक्ष असतो पण तो दिसतो का..? त्या वस्तूमधील त्याचे अस्तित्व दिसण्याकरिता काही क्रिया आधी घडून जाव्या लागतात. बीजातला वृक्ष दिसण्याकरिता बीजाला भूमी भेटावी लागते, पाणी मिळावे लागते, म्हणजेच वृक्ष दिसतो. प्रत्येकाच्या अंतरंगात देव आहे पण तो दिसावा असे वाटत असेल तर, एकनाथ महाराज म्हणतात - हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय..!या वचनांतून संत एकनाथ महाराज देव प्राप्तीचे वर्म सांगतात. संताकडे गेल्याशिवाय व त्यांची सेवा केल्याशिवाय देवाची ओळख होणार नाही. देव तर ह्रदयातच आहे. गीता माऊली म्हणते - सर्वस्य चाहं ह्रदीसंन्निविष्टो:..!माऊली म्हणतात,तैसा ह्रदयामध्ये मी रामु, असता सर्व सुखाचा आरामु,का भ्रांतासी कामु, विषयावरी..!संत सांगतात - प्रत्येकाच्या ह्रदयामध्ये असलेला परमात्मा सामान्य जीवांना विषयांच्या भ्रांतीमुळे दिसत नाही. अज्ञानाच्या आवरणामुळे तो जवळ असूनही कळत नाही. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेली विहीर आहे, आत पाणीही भरपूर आहे पण त्या पाण्यावर शेवाळ्याचे आवरण आलेले आहे त्यामुळे विहीरीत पाणी असून देखील दिसत नाही. पाणी प्यावयाचे असेल तर हाताने शेवाळे दूर करण्याची गरज आहे. अगदी तसेच देव दिसावा असे वाटत असेल तर, अज्ञानरु पी आवरण दूर करण्याची गरज आहे. संत जीवाच्या ठिकाणी असणारे अज्ञानरु पी आवरण दूर करण्याचे काम करतात. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात,हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. 83298 78467 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक