शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 19:36 IST

क्रोध हा एक असा विकार आहे की ज्यामुळे माणसाचे समाधान नष्ट होते.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी ( बीड ) 

क्रोध हा एक असा विकार आहे की ज्यामुळे माणसाचे समाधान नष्ट होते. आज बहुतांशी लोकांना या विकाराने ग्रासले आहे. याच क्रोधामुळे जीवनात अनेक अनर्थ घडतात. पण प्रश्न असा पडतो की हा क्रोध का बरं निर्माण होतो. .? शांतीसागर एकनाथ महाराज याचे कारण सांगतात; जेथे कामाचे अपूर्ण काज ! तेथे क्रोधाचे खवळे तेज!काम भोगात व्यत्यय आला की क्रोध उत्पन्न होतो. एका विधवा मातेला चार वर्षाचा मुलगा होता. तिचे एका पुरूषावर प्रेम बसले. तो तिला इतका आवडला की; त्याच्या शिवाय ती राहूच शकत नव्हती. पण तो पुरूष मात्र तिला स्वीकारण्यास तयार नव्हता. कारण तिला असणारा मुलगा त्याला मान्य नव्हता. त्या बाईला काम विकाराने पुरते ग्रासले होते. तिची अतृप्त इच्छा पूर्ण होण्याकरिता तिने मुलाचा गळा दाबला व त्याला ठार केले. जन्मदात्या आईला क्रोध विकाराने राक्षसीण बनवले. सुभाषितकार वर्णन करतात; क्रोधमूलमनर्थानां क्रोध:संसार बंधनम् ! धर्म: क्षयकर: क्रोध: तस्मात् क्रोधं परित्यजेत !!या एकाच विकारामुळे प्रपंचात अनेक अनर्थ निर्माण होतात. संत एकनाथ महाराज म्हणतात; क्रोधा ऐसा महान वैरी! जडला असता निज जिव्हारी! जो ज्ञानाची मानी थोरी ! तो संसारी अतिमूर्ख !!जो स्वत:ला आत्मज्ञानी म्हणवून घेत असेल, आणि त्याच्याजवळ क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे. एखादा स्वत:ला संत म्हणून घेत असेल, आणि त्याला क्रोध येत असेल तर तो संत नाही. हे विकार निर्माण होण्याचे एकच कारण आहे, अज्ञानाने देह म्हणजेच सर्वस्व आहे असे समजणे व देहाच्या सुखाकरिता विषयोपभोगा खेरीज दुसरे साधनच नाही असे समजून विकार वश होणे.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात; देहचि आपणपे मानिती ! विषय ते भोग्य म्हणती! यया पर ते न स्मरती आणकि काही!!म्हणूनच हे घातक विकार निर्माण होतात. त्या करिता देहाचे व देहासाठी लागणाऱ्या विषयांचे क्षणभंगुरत्व कळले पाहिजे. हा क्रोध निर्माण होऊच नये असे वाटत असेल तर एकनाथ महाराज रामबाण उपाय सांगतात;वाचे म्हणता शिवनाम ! तया न बाधी क्रोध काम!!

(लेखक के राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक