शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'काक: कृष्ण: पिक: कृष्ण:'; असा ओळखा संत आणि सामान्यांतील फरक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:15 IST

आज समाजजीवनात बहिररंग लक्षणालाच प्राधान्य दिले जाते. अंतररंग लक्षण कुणी बघतच नाही म्हणून तर समाज जीवनाला अवकळा आली आहे..!

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

काक: कृष्ण: पिक: कृष्ण:को भेदो पिक काकयो:वसंत समये प्राप्तेकाक: काक: पिक: पिक:कावळा आणि कोकिळा यातील फरक काय..? कावळाही रंगाने काळा आणि कोकिळाही रंगाने काळीच आहे. समजा दोघेही झाडाच्या एकाच फांदीवर बसले असतील तर, ओळखणे कठिणच..

या दोघातला भेद बघावयाचा असेल तर, सुभाषितकार म्हणतात - वसंतऋतूची वाट बघा.वसंत समये प्राप्ते वसंतऋतू आला की, कोकिळा गायला लागते मग कावळ्याला वाटते आपण का गप्प बसा..? मग तोही ओरडायला लागतो मग आपल्याला कळतं की, हा कावळा आणि ती कोकिळा आहे. कोकिळेचा स्वर कळण्यासाठी वसंतऋतूची वाट बघावी लागते तसे संत आणि सामान्य माणूस यांच्यातील भेद कळण्यासाठी दोघांची लक्षणं बघावी लागतील. बगळा आणि हंस दोघेही सारखेच दिसतात पण कोणता हंस आणि कोणता बगळा हे ओळखावयाचे असेल तर, सुभाषितकार म्हणतात - क्षीर नीर विभागेतुहंसो हंस: बको बक:दूध आणि पाणी यांचं मिश्रण करून ते भांडे दोघांच्या समोर ठेवून द्या. त्या मिश्रणातून पाणी वगळून जो दूधच पितो तो हंस..! 

माऊली म्हणतात -चांचुचेनी सांडसे खांडिजे पयपाणी राजहंसेकोणता बगळा आणि कोणता राजहंस हे कळण्यासाठी जशी परीक्षा घ्यावी लागते, तसे सामान्य माणूस आणि संत कळण्यासाठी परीक्षा घ्यावी लागेल. नाहीतर आपण कुणालाही संत म्हणू.. संतांची लक्षणं सांगतांना निळोबाराय म्हणतात -निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचासंतांचे महत्वाचे लक्षण म्हणजे ते लौकिक विषयांपासून विरक्त असतात. त्यांचा विषय हा नारायणच असतो. तुकोबा म्हणतात -विषय तो त्यांचा झाला नारायणनावडे जन धन माता पितासामान्य माणूस देहात व तद् विषयक विषयात आसक्त असतो. संताच्या बाबतीत, विषयी विसर पडला नि:शेषअंगी ब्रह्म रस ठसावलाअशी स्थिती असते. आज समाजजीवनात बहिररंग लक्षणालाच प्राधान्य दिले जाते. अंतररंग लक्षण कुणी बघतच नाही म्हणून तर समाज जीवनाला अवकळा आली आहे..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र.- 9421344960)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक