शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मनाच्या प्रसन्नतेवरच आरोग्य अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 07:22 IST

मानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते. मनाची अवस्था जशी असेल तशी शरीर प्रक्रिया घडते. मनाच्या प्रसन्नतेवरच सर्व आरोग्याचा खेळ अवलंबून असतो. मनात जे भाव निर्माण होतात त्यानुसार त्या माणसाची वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. धैर्यशील मन मोठमोठ्या संकटांवर मात करते. हळवे मन छोट्या-छोट्या गोष्टींवरून कमजोर बनते. मनाची चंचलता ही तुमच्या प्रगतीला आड येते. चंचल मन असल्यास जीवनात अस्थिरता येते. स्थिर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाला शक्तिशाली बनवा. दिवसागणिक-क्षणोक्षणी मनात येणारे विचार कुठल्याही कार्याला प्रेरणा देतात किंवा नुकसानदायक ठरतात. संयमशील मन मनाची निर्णयक्षमता वाढवते. कर्म चांगले करा मनाला विकारापासून दूर ठेवा. मन एका ठिकाणी न बसता सर्वत्र फिरते. मनाला आवर घालणे महाकठीण काम असते. मनाला नम्र बनवायचे असेल तर ध्यानधारणा-योग यांचा आधार घ्यावा लागतो. ‘मन’चा शब्दाचा उलट अर्थ केला तर नम: होता. नेहमी तुम्ही सद्वृत्तीत मन रमवा. सद्वृत्ती मनाला आवर घालते. वासनांना आळा घालण्यासाठी मनाचा उपयोग होतो. सर्वप्रथम कुठलाही विचार मनात येतो. त्यानुसार बुद्धी कार्याला प्रवृत्त करते. मनाची स्थिती-गती-लय- आपल्या वैचारिकतेवर अवलंबून असते. ‘मन गया तो जाने दे। मत जाने दे शरीर। ना खिचे कमान को कहा लगेगा तीर।।’ असे संत कबिरांनी सांगितले आहे. एखादवेळेस मन कुठेही भटकते, तसे शरीराला भटकू देऊ नका. मनाप्रमाणे इंद्रियं धाव घेतात; पण त्यावरती संयम ठेवून वागणे महत्त्वाचे असते. मनाचे भावच वैचारिक भाव बदलवतात.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)