शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुखदु:ख नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:25 IST

ज्ञानात खरं, अज्ञानात खोटं असतं. ज्ञानी सावध असतो. त्याला परिणाम दिसतो.

- बा.भो. शास्त्रीसुखदु:खाचा दाता कोण आहे? याचं उत्तर आपणच आहोत. चविष्ट भाजी बाईने केली. सुख तयार झालं, बेचव झाली तर, दु:ख. दोन्ही आपल्या हातातच आहे. एक ज्ञानात, एक अज्ञानात आहे. बरंवाईट आपल्याच हातात आहे. दोन्हीही कर्मजन्य आहेत. दु:खाला कारण अज्ञान आहे, आणि सुखाला कारण ज्ञान आहे. ज्ञानात खरं, अज्ञानात खोटं असतं. ज्ञानी सावध असतो. त्याला परिणाम दिसतो. अज्ञानी बेसावध असतो. भावनेच्या भरात चटकन कुणाला चंद्रमुखी उपमा देतो. जेव्हा त्याला सौंदर्याखाली अग्नी असल्याचं लक्षात येतं. तेव्हा तोच त्याला ज्वालामुखीची उपमा देतो. ज्ञानी अचूक निर्णय घेतो. ज्ञान पवित्र व अज्ञान अपवित्र आहे. जीवनात आपण अन्न, वस्त्र, निवारा यांचं नियोजन करीत असतो, तसं सुखाचं करता येणार नाही? करता येतं. नराचा नारायण होता येतं. इतिहासात लहान माणसं मोठी झाली. दुष्ट झाली. मूर्ख विद्वान झाले, आपण पाहातोच. जाणते जेवणाचाच विचार करीत नाहीत, तर त्यांच्यात जीवनाचाही विवेक असतो. भविष्यात काय व्हायचं हे ते ठरवतात व होतात. मेल्यावर लोकांनी काय म्हणून आपली आठवण करावी हे त्यांनी निश्चित केलेलं असतं. पुण्यतिथी, जयंती हे तेच आहे. ती योग्यता त्यांनी स्वत:त निर्माण केली. काही दु:खाचे डोंगर उभारतात. विवेकी चहात बिस्किट बुडवतो, चटकन काढतो. सुखाने खातो. अविवेकीही बुडवतो, पण काढायला वेळ लावतो. बिस्किट कपाच्या तळाशी गाळ होऊन बसतं. दु:ख जन्माला येतं. किती वेळ ठेवायचं कळत नाही. सुख व दु:ख एकाच कपात तयार होतात. कपाचा दोष नाही. सुखदु:खाचं नियोजन आपल्या ज्ञानावरच आहे. सामान्य माणसाला आपण किती प्रदूषण निर्माण करतो कळत नाही. शब्दापेक्षा चित्र प्रभावी असतं. एका पुस्तकाचा आशय त्यात असतो. म्हणून गायछाप तंबाखूच्या पुडीवर विंचवाचं चित्र असतं, तरीही लोक खातात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक