शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ज्ञानग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:21 IST

- वामन देशपांडे शारीर भावनेने जगणारे जीव सहसा मोहग्रस्त आयुष्य जगत असतात आणि हीच मोहग्रस्त माणसे इंद्रियांच्या वासनांना, त्यांच्या ...

- वामन देशपांडेशारीर भावनेने जगणारे जीव सहसा मोहग्रस्त आयुष्य जगत असतात आणि हीच मोहग्रस्त माणसे इंद्रियांच्या वासनांना, त्यांच्या पूर्तीसाठी शरण जातात. कारण एकच त्यांची बुद्धी आणि मन या वासनाग्रस्त इंद्रियांना त्यांची वासनातृप्ती व्हावी म्हणून मदत करतात. साधकाने प्रथम या चंचल मनाला आणि वासनातृप्ती व्हावी म्हणून सुसाट वेगाने धावणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ज्ञानसाधना करणे, तत्त्वज्ञानाची प्राप्ती करून घेणे, मुख्य म्हणजे अज्ञान भारल्या विचारांचा नाश करणे आवश्यकच आहे. त्यासाठी प्रथम तत्त्वज्ञानी महापुरुषाच्या सान्निध्यात अधिक काळ घालवून ते तत्त्व समजून घेत, त्यांना पूर्णांशाने शरण जायला हवे. तेव्हाच ते तत्त्वज्ञानी महापुरुष शुद्ध ज्ञानाचा अंत:करणपूर्वक उपदेश करतात. भगवंत अर्जुनाला निखळ सत्य सांगतात की,

न हि ज्ञानेन सद्दशं पवित्रमिह विद्यते।तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्ममि विन्दति।

पार्था, मानवी आयुष्यात ज्ञानग्रहणाइतके पवित्र साधन दुसरे कुठलेच नाही. शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घेणे, हेच आपल्याकरिता असलेल्या साधनेचा प्रधान हेतू हवा. ज्याला निष्काम कर्मयोग साध्य झाला आहे, त्याला ज्ञानयोग अवश्य प्राप्त होतो. जो ज्ञानी असतो, तोच कर्मयोगी असतो... परमात्मा परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांड व्यापूून आणि तोच परमात्मा सूक्ष्म आत्मस्वरूपात प्रत्येक जीवात नांदतो आहे. या परम तत्त्वाचे ज्ञान होणे, ही प्रत्यक्ष अनुभूती होणे, हे आपण करीत असलेल्या साधनेचे अत्युत्तम फळ आहे. परब्रह्म निर्गुणनिराकार आहे, तसेच परमात्मा हा सगुण साकार आहे याची प्रचिती यावी लागते. त्यासाठी मनाची निर्द्वंद्व अवस्था प्रथम यावी लागते. राग, द्वेष, अहंकार तसेच शरीरात ठाण मांडून बसलेले ‘मी’पण जर पूर्णपणे संपुष्टात आणायचे असेल तर त्यासाठी प्रथम निर्द्वंद्व अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. तेव्हाच परमात्म्याच्या नामात चित्ताला गुंतवता येते. तेव्हाच संसारबंधन तटातटा तुटते. प्रपंच बंधनकारक होत नाही. एकदा का भगवंताविषयी अपार प्रेम जर निर्माण झाले की भोवतीच्या सर्व जीवांविषयी आत्मीयता वाटू लागते. भगवंत प्रत्येक जीवात नांदतो आहे याचे भान येते. भगवंत म्हणतात,

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।निर्द्वंद्वोे नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान ।।

पार्था, वेद तर सत्त्व-रज-तम या तीन गुणांचे त्यांच्या स्वभावानुसार मानवी आयुष्य कार्यान्वित होते, त्याचेच प्रामुख्याने वर्णन करतात. माणूस मूलत: त्रिगुणाधिष्ठितच आहे. पार्था तू त्रिगुणातीत हो. निर्द्वंद्व अवस्था प्राप्त करून घे. षडरिपूंपासून मुक्त हो. तू परमात्म्यात विलीन हो. योगक्षेमाची काळजी करू नकोस...कर्म करीत असतानाच, करीत असलेल्या विहित कर्मापासून आणि कर्मफलापासून अलिप्त होणे ही निर्लिप्त कर्म करण्याची वृत्ती साधकाला ज्ञानमार्गावर अलगदपणे आणून सोडते. साधकाने हे लक्षात ठेवायला हवे की, कामनाग्रस्त कर्मे, पापकर्मे म्हणजे निषिद्ध कर्मे होतात. ही पापकर्मेच तर संचित पुण्याचा ºहासकरतात. यासाठी निष्काम कर्मयोग जर साधकांनी आचरणात आणला तरच मोक्षप्राप्तीच्या दिशेने साधकाला वेग येतो.भगवंतांनी मोठ्या प्रेमाने महत्वाचा विचार दिला की, गहना कर्मणो गति: ।।गीता।। ४ :१७ ।।पार्था, तुला मी एकच निखळ सत्य सांगतो की, आपण जेव्हा कर्म करीत असतो तेव्हा करीत असलेल्या कर्मापासून मनाने अलिप्त होत, कर्म पूर्ण करणे हाच खरा, कर्माचे तत्व जाणून घेत कर्म करीत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर निर्लेप मनाने कर्म करणे म्हणजे अकर्माला जाणून घेणे आहे. त्यात ‘मी’पण संपुष्टात आलेले असते.