शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सांग रे उद्धवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 03:38 IST

कृष्ण मथुरेला गेला. कंसवध केला. श्रीकृष्णाचा उद्धव नावाचा जिवलग मित्र होता. त्याला कृष्णाने गोकुळात जाऊन वियोगामुळे दु:खी झालेल्या मातापित्यांना कुशल सांग. गोपींना माझा निरोप सांगून त्यांची मनोव्यथा दूर कर, असे सांगितले.

- सौ. शैलजा भा. शेवडेकृष्ण मथुरेला गेला. कंसवध केला. श्रीकृष्णाचा उद्धव नावाचा जिवलग मित्र होता. त्याला कृष्णाने गोकुळात जाऊन वियोगामुळे दु:खी झालेल्या मातापित्यांना कुशल सांग. गोपींना माझा निरोप सांगून त्यांची मनोव्यथा दूर कर, असे सांगितले. उद्धवाने तसे केले, तेव्हा गोपी उद्धवाला म्हणाल्या -‘सांग रे उद्धवा, स्मरतो का कृष्ण कधी,वृन्दावनां आणि अम्हां, ग्राम्यगोपिकांना,मथुरेत जाऊनिया, वाटतो जणू विसरला,येईल का फिरून कृष्ण, सांग रे आम्हांला’शरद रात्र, पूर्णचंद्र, कुमुद गंध दरवळला,कृष्णगान, ते मुखात, नुपुरनाद रुणझुणला,वृंदावन, रासक्रीडा, स्मरते का कधी त्याला,येईल का, फिरून कृष्ण, सांग रे आम्हालाग्रीष्मातील शुष्क वन, म्लान आम्ही कृष्णाविनकृपाकटाक्ष संजीवन, सळसळेल, देही प्राण,गोविंद, हा मंत्रच तो, देहांत या किती घुमला,येईल का, फिरून कृष्ण, सांग रे आम्हालाघेऊन येई गार्इंना, चरावया या इथे,खेळत, गोपांसह, भूमीवर या इथे,वेणुनाद घुमतसे, तीरावर या इथे,श्रीनिकेतन पावले, उमटली या इथे,व्याकुळ अम्ही, स्मरतो रे, पुन्हा-पुन्हा कान्ह्याला,येईल का फिरून कृष्ण, सांग रे आम्हालासांग कसे विसरू आम्ही, सुंदर ते चालणे,मनमोहक हास्य आणि मधुर ती भाषणे,हरवलो अच्युतात जणू, अशा स्वत:ला,येईल का फिरून कृष्ण, सांग रे आम्हाला‘कृष्ण कृष्ण’ करत गोपी बेभान पुन्हा जाहल्या,कृष्ण इथे, कृष्ण तिथे, प्रार्थना करू लागल्या,‘हे नाथ, रमानाथ, व्रजनाथ, दु:खनाशका,दु:खसागरी, गोकुळ बुडे, वाचव रे आम्हाला’

टॅग्स :spiritualअध्यात्मिक