शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:09 IST

ब्राह्मणपूजन, ब्राह्मणभोजन आणि पिंडप्रदान ही श्राद्धाची मुख्य कृत्ये आहेत.

ब्राह्मणपूजन, ब्राह्मणभोजन आणि पिंडप्रदान ही श्राद्धाची मुख्य कृत्ये आहेत. त्यातही ब्राह्मणभोजन व कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी भोजन घेणे महत्त्वाचे समजले जाते. श्राद्ध-पक्ष यांचा स्वयंपाकही शास्त्राने सांगितल्यानुसार असावा. त्यात भात, खीर, अळु, भाज्या, चटण्या, कोशिंबीर, पोळी, वडे, लाडू, तूप, वरण, जवस, तीळ यांचा समावेश असतो. काही ठिकाणी दुधात तांदूळ घालून त्याची खीर करतात तर काही ठिकाणी गव्हाची खीर करतात.श्राद्ध-पक्षाच्या दिवशी घरच्या देवाचे नैवेद्य, देवस्थानचे ब्राह्मण व पितृस्थानचे ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कढी, लिंबू व मीठ वाढत नाहीत. त्यामागेही हेच कारण आहे. पितरांना भाजलेले, तळलेले पदार्थ आवडतात. परंतु त्यांना उकळलेले, आंबट व खारट पदार्थ आवडत नाहीत, असे आपल्याकडे समजतात. त्याचमुळे कढी, लिंबू व मीठ हे पदार्थ आधी वाढत नाहीत.ब्राह्मण जेवायला बसल्यावर वाढण्याची प्रथा आहे, असे वेदशास्त्र संपन्न रामकृष्ण बाणेगावकर यांनी सांगितले. ब्राह्मणांच्या भोजनाबरोबरच स्वयंपाकाच्या सुवासानेही पितृ तृप्त होतात. स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ भाजताना, तळतानाचा सुवास त्यांना आवडतो. फळांमध्ये केळी, आंबा, बोर, फणस, डाळिंब, खजूर, द्राक्ष, दधिफल (कपित्थ), नारळ आदी पितरांना आवडतात. काकडी, दोडकी, पडवळ, खजूर, चिंच, आले, सूंठ, मुळा, लवंग, वेलदोडे, पत्री, हिंग, ऊस, साखर, गूळ, सैंधव आदी वापरावेत, असेही शास्त्रकारांचे मत आहे. याबरोबरच गाईचे दूध, दही, तूप तसेच म्हशीचे लोणी न काढलेले ताक, तूप वापरावे, असेही सांगितलेले आहे. याबरोबरच ज्या मृतात्म्यासाठी श्राद्ध करीत आहोत, त्याचा एखादा आवडीचा पदार्थ असेल तर तोही भोजनात द्यावा, असे सांगतात. याशिवाय विविध प्रदेशानुसारही स्वयंपाकाच्या पदार्थांमध्ये थोडीफार भिन्नता आढळून येते. असे असले तरी पितर सर्वांत जास्त तृप्त होतात ते खीर व मधामुळे. त्यामुळे श्राद्धामध्ये या दोन्हींचा समावेश असलाच पाहिजे, असे उल्लेख अनेक ठिकाणी आलेले आहेत. श्राद्धासाठी तयार केलेले अन्न हे मधयुक्त व मधुर असावे. अत्यंत रुचकर असा स्वयंपाक करावा व त्याने ब्राह्मण तृप्त व्हावेत. ब्राह्मण तृप्त झाल्यानंतर त्यांच्या अनुज्ञेने मग उर्वरित स्वयंपाकातून पिंड करावेत व पिंडपूजन झाल्यानंतर श्राद्धकर्त्याच्या कुलामध्ये उत्पन्न झालेल्यांनी, नातेवाईकांनी, आप्तेष्टांनी, मित्रांनी उर्वरित अन्न सेवन करावे, असा शास्त्राधार आहे.

संकलन - सुमंत अयाचित