शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 03:06 IST

’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’

- प्रल्हाद वामनराव पैराष्ट्रभक्ती म्हणजे आपलं प्रत्येक पाऊल राष्ट्रहितार्थ असायला हवं. आज लॉकडाऊनच्या काळात आपण सरकारने सांगितलेले सर्व नियम व अटी पाळणे म्हणजे राष्ट्रभक्ती. जीवनविद्या मिशनमधील बालसंस्कार केंद्रातील एक मुलगी एका वेगळ्या शिबिरात गेली होती. तिथे त्यांना एक प्रश्न विचारला गेला, ‘एक कप चहासाठी किती गोष्टींची आवश्यकता आहे?’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’ कसं काय बरं? तिने सविस्तर उत्तर दिलं, ‘ऊस लावणाऱ्या शेतकºयापासून ती साखर तयार होऊन दुकानातून आपल्या घरी पोहोचण्यापर्यंत अनेकांचा हातभार लागलेला असतो. तसंच चहा पावडर, दूध, गॅस, पाणी, भांडी आदींबाबतीतही! पाहिलंत मुलांनो, आपण फक्त एक कप चहा पिताना किती हातांची मदत घेत असतो! पण याची जाणीव आपल्याला असते का?’ अशा एकमेकांच्या आधारावर, कष्टावर हे जग चाललं आहे. प्रत्येकजण वेगवेगळी कामे करतो म्हणून या जगात एकप्रकारची व्यवस्था आहे. स्वत:ला आपण केंद्रस्थानी ठेवून आपण पाहिलं तर मी, माझ्या गरजा, माझे कुटुंब, समाज, राष्ट्र, पर्यावरण या सर्वांचा आपल्याला वेळोवेळी उपयोग होत असतो. आपली व्यवस्था होत असते. सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. शेतकऱ्यांमुळे अन्नाचा घास मिळतोय. कामगारांमुळे वेगवेगळ्या वस्तू आपल्यापर्यंत येतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे जगाला फायदा होतो. शिक्षकांमुळे ज्ञान, तर डॉक्टरांमुळे आरोग्य, सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय? सर्व लोक आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असताना राष्ट्र, समाजासाठी योगदान देत असतात. हे समाजऋण फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, आपले काम प्रामाणिकपणे, आवडीने करून! समाज सुखी तर आपण सुखी, हे लक्षात घेऊन सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना म्हणूया, असे शुभचिंतन प्रत्येकाने केले तर तो उत्तमरीतीने समाजऋण फेडू शकतो!