शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वराचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 02:57 IST

खूप लोकांना असे वाटते की ‘सद्गुरू’ ही एक उपाधी आहे, पण खरं तर ती एक व्याख्या आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सद्गुरू असे म्हणता, त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही त्यांच्याकडे धर्मग्रंथ समजून घेण्यासाठी जात नाही.

-सद्गुरू जग्गी वासुदेवप्रश्न : सद्गुरू, नमस्कार. मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहे. माझी पहिली शंका अशी आहे की, तुम्ही कधी ईश्वर अनुभवला आहे का?सद्गुरू : खूप लोकांना असे वाटते की ‘सद्गुरू’ ही एक उपाधी आहे, पण खरं तर ती एक व्याख्या आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला सद्गुरू असे म्हणता, त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही त्यांच्याकडे धर्मग्रंथ समजून घेण्यासाठी जात नाही. कारण त्यांनी कोणतेही धर्मग्रंथ वाचलेले नाहीत. तुम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. ते तिथे गेलेले नाहीत आणि त्यांना तिथे जाण्यातही काही रस नाही.सद्गुरू याचा शब्दश: अर्थ आहे ‘जो आतून प्रकट होतो.’ माझं जीवन हे पूर्णपणे, त्याच्या आरंभापासून अंतापर्यंत सविस्तरपणे मला माहीत आहे. आणि केवळ एवढंच मी जाणतो. निसर्गाच्या रचनेबद्दल कन्स्ट्रक्टल लॉ नावाचा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. हा सिद्धांत हे सिद्ध करायचा प्रयत्न करतो की, ज्या प्रकारे एका अणूची निर्मिती झाली आहे, अगदी त्याच प्रकारे या ब्रह्मांडाचीही निर्मिती झालेली आहे. ज्याप्रकारे एका पेशीची रचना केली गेली आहे, अगदी त्याच प्रकारे प्रत्येक जीव निर्मिलेला आहे. एक अमिबा ज्या प्रकारे घडवला गेला आहे, त्याच प्रकारे एक मनुष्यसुद्धा घडवला गेला आहे. फक्त त्या त्या निर्मितीमधील गुंतागुंत आणि क्लिष्टता कमी-जास्त असेल एवढंच. निसर्गाचा हा आविष्कार एका मोठ्या चमत्काराप्रमाणेच आहे. ते पाहून मनुष्य अचंबित होतो.योग विज्ञानात याबद्दल आम्ही नेहमीच बोलत आलेलो आहोत अंड आणि पिंड दोन्ही एकच आहेत. सृष्टीच्या मूलभूत रचनेच्या स्वरूपात, सर्वात सूक्ष्म रचना आणि सर्वात विशाल रचना दोन्ही एकसमान आहेत. फक्त त्यामधील गुंतागुंत आणि क्लिष्टता कमीअधिक आहे एवढंच.म्हणून, माझं जीवन म्हणून जे आहे, ते पूर्णत: मी जाणलेलं आहे. सुदैवाने तुम्हीसुद्धा माझ्यासारखंच एक जीवन आहात, म्हणून मी जर माझ्याबद्दल बोलत असलो, तर तुम्हाला असं वाटतं की, मी तुमच्याबद्दल बोलतो आहे. मी माझ्याबद्दल बोलत असलो, तर तुम्हाला असं वाटतं की, मी ब्रह्मांडाबद्दल बोलतो आहे. मी जर माझ्याबद्दल बोलत असलो, तर काही लोकांना असं वाटतं की, मी ईश्वराबद्दल बोलतो आहे. हे सर्व त्यांच्या त्यांच्या मनाचे अन्वयार्थ आहेत. पण मी फक्त केवळ माझ्याबद्दल बोलतो आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक