शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामय व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 04:33 IST

अध्यात्म आणि योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते. मुख्यत्वे तीन प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते - सात्विक, राजसी व तामसी.

- डॉ. भूषण कुमार उपाध्यायअध्यात्म आणि योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते. मुख्यत्वे तीन प्रकारच्या व्यक्तींचे वर्णन पाहायला मिळते - सात्विक, राजसी व तामसी. सात्विक व्यक्ती नेहमीच पवित्र विचार, वाणी व कर्माने ओतप्रोत असते. त्या व्यक्तीची सर्व कार्ये ही लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित असतात. याउलट तामसी वृत्तीचे व्यक्ती असतात, जे सदैव दुसऱ्यांचे नुकसान करीत असतात व त्यांचे विचार, वचन व कर्म निषिद्ध असतात. या दोहोंच्या मधली जी स्थिती असते त्याला राजसी संबोधले जाते.या तीन प्रकारच्या व्यक्ती आपल्या चारही बाजूला एकप्रकारच्या ऊर्जेचे जाळे तयार करतात. हे ऊर्जामय जाळे कशाप्रकारचे असेल ते आपले विचार-वचन-कर्म यांची त्रिसूत्री ठरवते. सात्विक, राजसी व तामसी प्रवृत्तीचे जितके आधिक्य असेल तेवढे त्या प्रवृत्तीचे जाळे तयार होईल.आधुनिक विज्ञानाने bio-feedback यंत्र बनविलेले आहे. मानवाच्या मनात कशाप्रकारचे विचार सुरू आहेत व मानवाच्या शरीरावर त्याचा काय प्रभाव पडेल, हे या यंत्राच्या माध्यमातून कळण्यास मदत होते. एका तणावग्रस्त व्यक्तीच्या मस्तिष्कामधून जी ऊर्जा निघते, ती एखाद्या आनंदी व्यक्तीच्या मस्तिष्कामधून निघणा-या ऊर्जेपेक्षा पूर्णत: वेगळी असते. भारतीय परंपरेत वलयाचे वर्णन पाहायला मिळते. अनेकदा चित्रात महान संतांच्या मस्तिष्काच्या चारही बाजूला एक दिव्य प्रकाश दिसून येतो. यालाच इंग्रजीमध्ये ं४१ं संबोधले जाते. हे वलय संतांच्या पवित्र ऊर्जेचा संकेत आहे.अनेकदा बºयाच व्यक्तींना एखाद्याला भेटून असा अनुभव येतो की, त्याचे मन व शरीराची ऊर्जा वाढलेली आहे. याउलट अनेक व्यक्तींच्या संपर्कातून नैराश्य व नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या अनुभवाचे प्रमुख कारण म्हणजे - मानवाचे वेगवेगळे सात्विक, राजसी व तामसी कर्म. आपले व्यक्तिमत्त्व जसजसे सात्विक होईल, तसतशी आपल्या व्यक्तिमत्त्वामधून निघणारी ऊर्जा ही सकारात्मक होत जाईल. अध्यात्म व योगशास्त्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाºया अनेक विधींचे वर्णन आलेले आहे. शरीर व मनाच्या शुद्धीचा यात प्रामुख्याने उल्लेख आहे. शरीराची शुद्धी पाण्याने व मनाची शुद्धी सिद्धचाराने होते. वाणीची शुद्धी मधूर व सत्य वचनाने होते. नि:स्वार्थ भाव व लोककल्याणाच्या भावनेने केलेले कर्म आपल्याला कार्मिक शुद्धता प्रदान करतात. अशाप्रकारचे शुद्ध व्यक्तिमत्त्व आपल्याभोवती एक चुंबकीय ऊर्जामय वलय तयार करीत असतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक