शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

अहंकारमुक्त मन हे सदविचारांचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:18 IST

याची देही याची डोळा या म्हणण्यानुसार प्रत्येकास आपल्या कर्माचे फळ हे भोगावे लागतील.

मानवाच्या जन्म जणू काही दुःख भोगण्यासाठी झाला आहे असे आपल्याला भासते. आसक्ती हे मूळ दुःखाचे कारण असून राग मोह मत्सर हे त्यात वाढ करतात. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात,

रजतमसत्व आरे ज्याचे अंगी ।याचे गुणे जगी वाया गेला ।।तम् म्हणजे काय नरक केवळ ।रज तो सनक मायाजाल ।। 

मानवाच्या कर्मानुसार पाप-पुण्य संचित होते. याची देही याची डोळा या म्हणण्यानुसार प्रत्येकास आपल्या कर्माचे फळ हे भोगावे लागतील. मानवी जन्म हा सर्वश्रेष्ठ जन्म मानला जातो. ज्यांना हा जन्म लाभला त्यात स्वतःचा उद्धार करण्याची संधी ईश्वराने प्रदान केलेली असते. त्याचा यथोचित उपयोग  करण्याऐवजी माणूस हा सुखाच्या मागे लागलेला आहे.बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे मानवाच्या उद्धारासाठी जेवढ्या संत विभूती होऊन गेल्या त्यात महाराष्ट्रात बहुसंख्य झाले. त्यामुळेच महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हटले जाते. भक्ती संप्रदायाचे वारे बाराव्या शतकापासून सर्वत्र पसरले आहे.महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे पाहिले जाते. अगदी बालवयात सर्व मनुष्यप्राणी मात्रास देव विद्या व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा  मंत्र त्यांनी दिला. 

'मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीसी आले'. या  ज्ञानदेवांच्या आगळ्यावेगळ्या रचनेत त्यांनी मन हे राम रंगी रंगले आहे. असे सांगून वृत्ती प्रवृत्ती नष्ट होऊन निवृत्ती प्राप्त झाल्याचे ते सांगतात. नवविद्या भक्ती व समाधी स्थिती यांचा सुरेख संगम घडवून आणून भक्तिमार्ग आणि योगमार्ग या दोन्ही ईश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.

'अहंभाव लोपणे' हा परमेश्वर प्राप्तीच्या मार्गातील अंतिम टप्पा असून  या अर्थपूर्ण रचनेत भक्ती आणि योगाचे मर्म सहजतेने स्वतःच्या अनुभवाने मांडलेले आहे. चिरंतन मूल्यांचा आणि आचारधर्माची  शिकवण संतांनी मानवांना दिली आहे.  ते म्हणतात आपल्याजवळील अहंकार नष्ट करावा. आणि सर्वांनी समभावाने वागावे. यामुळेच मनुष्य सदगतीस प्राप्त होतो. सर्वाविषयी क्षमा भाव ठेवावा. मनामध्ये एकत्वाचे चिंतन असावे. जेणेकरून अहंभाव लोप पावतो. हीच वाक्यता गर्भित स्वरूपात संत निवृत्तीनाथ मांडताना म्हणतात, समता  वर्तावी अहंता खंडावी, तेनीची पदवी मोक्षमार्ग, अहंकार मुक्त मन हेच सदविचार व सदगतीचे लक्षण असून सदविचारांच्या वाढीचे गमक आहे.

- भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातूर

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक