शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 5

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:32 IST

माणसाला सुख हवे असते पण ते त्याला मिळत नाही त्याला  दु:ख नको असते पण तरी  देखील दु:ख त्याच्यापाठी हात धुऊन लागते.इथे मनात प्रश्न निर्माण होतो.

- सदगुरू श्री वामनराव पैपर्यावरणात सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत.माणसाला सुख हवे असते पण ते त्याला मिळत नाही त्याला  दु:ख नको असते पण तरी  देखील दु:ख त्याच्यापाठी हात धुऊन लागते.इथे मनात प्रश्न निर्माण होतो. लक्षात ठेवा जीवनविद्या नेहमी का हा प्रश्न विचारा असे सांगते. कारण प्रश्न विचारला की त्यातून तुमच्या चिंतनाला सुरवात होते.तुम्ही वाचन करू लागता श्रवण करू लागता त्यातून तुमचा अभ्यास व्हायला लागतो त्यात जर तुम्हांला ख-या सदगुरुंचे मार्गदर्शन मिळाले की तुम्हांला त्या प्रश्नांचे उत्तर मिळू लागते.म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की प्रश्न विचारा.सायंटिस्ट काय करतात? ते स्वत:ला प्रश्न विचारतात व त्यांच्या संशोधनाला सुरवात  करतात.फळ खाली का पडले वर का गेले नाही हा प्रश्न पडला व त्यावर  संशोधन झाले.असे का? या प्रश्नाने जीवनात क्रांती घडते म्हणून जीवनविद्येला का? हा प्रश्न फार आवडतो.प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारला की तुम्हाला ब-याच गोष्टींचा उलगडा होऊ लागतो.अर्थात त्याला वाचन-श्रवणाची जोड ही हवीच नाहीतर तुम्ही उगीच का-का? करत बसलात तर कावळे व्हाल दुसरे काही होणार नाही.सांगायचा मुद्दा असा की माणूस जन्माला आल्यापासून दु:खी होतो त्याचे कारण काय?याचा जर आपण विचार केला तर माणसावर जन्मोजन्मी जे संस्कार होतात ते संस्कार जर विशिष्ट पध्दतीने झाले तर मानवी जीवनात सुखी होतो.आता इथे मी केवळ माणूस म्हणून विचार करतो.तो कुठल्या जातीचा,पंथाचा,धर्माचा असा विचार करत नाही.कारण संतांनी सर्व भूतमात्राचा विचार केलेला आहे आणि भूतमात्रांमध्ये आणि माणसाचा देखील संबंध येतो.आपण पर्यावरण असे म्हणतो.पर्यावरणामध्ये पशु-पक्षी जलचर माणसे हया सर्वांचा समावेश होतो.पर्यावरणात सर्व एकमेकांवर अवलंबून असतात.जशी एक वीट घसरली तर दुसरी वीट घसरते तिसरी वीट घसरते व शेवटी संपूर्ण इमारतच कोसळते.तसेच पर्यावरणाचे आहे.एक घटक घसरला की दुसरा घटक घसरतो व सगळे पर्यावरण बिघडू लागते.पृथ्वीचा किंवा पाण्याचा लय झाला तर बाकी सगळ्यांचा लय होणार,प्रकाशाचा लय झाला तर जगात काहीच उरणार नाही.हवेचा लय झाला तर कुणीच शिल्लक रहाणार नाही.आपले शरीर तरी काय आहे? आपल्या शरीरांत पंचकर्मेंद्रिये आहेत,पंच ज्ञानेंद्रिये आहेत,पंच तन्मात्रा आहेत.मन चित्त बुध्दी अहंकार हे सर्व मिळून आपण आहोत.त्यात कल्पना भावना धारणा हया सर्व शक्ती मिळून आपण आहोत.यातले काहीही एक वजा केले तरी जीवनाला अर्थ उरत नाही.तुमची स्मरणशक्ती वजा केली तर तुमच्या जीवनाला काही अर्थ उरणार नाही. तुमच्या ठिकाणची जाणीव वजा केली तर जीवनाला काही अर्थ उरणार नाही.तुमच्या शरीरातला प्राण काढून घेतला तर जीवनच शिल्लक रहाणार नाही.