शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण आणि शिस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 04:02 IST

सक्तीने कोणतीही कृती सातत्याने लादण्याचा प्रयत्न कराल, तर तुमचे आयुष्य बेसूर होते.

- सद््गुरू जग्गी वासुदेवसक्तीने किंवा धाक दाखवून कोणतीही शिकवण लादता येत नाही. काही काळ सक्तीने थोड्याफार गोष्टी तुम्ही लोकांना करायला भाग पाडू शकता. पण ही सक्ती जर दीर्घकाळ असेल तर तुमच्या आणि त्यांच्या, दोघांच्याही जीवनावर त्याचा परिणाम होतो. सक्तीने कोणतीही कृती सातत्याने लादण्याचा प्रयत्न कराल, तर तुमचे आयुष्य बेसूर होते. त्याचवेळी त्या सक्तीपासून दूर जाण्यात जीवन बेताल होते़ वस्तुत: शिस्त आणि काहीही शिकणे हे दोन्ही शब्द एकसमान आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता की ‘मी शिस्तप्रिय आहे’ याचा अर्थ तुम्ही नेहमी शिकण्यासाठी तयार आहात. तुम्ही कुठल्याही साच्यात बंदिस्त झालेले नाहीत. तुम्ही शिस्त पाळता म्हणजे तुम्ही सातत्याने काही नवे शिकण्याचा प्रयत्न करता. त्यासाठी तयार असता. उत्सुक असता. त्याचवेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की एखादी गोष्ट दररोज साचेबद्धपणे विशिष्ट प्रकारे करणे म्हणजे शिस्त नव्हे. उलट प्रत्येक गोष्ट उत्तमरीत्या करायला शिकण्यासाठी राजी असणे आणि त्या दिशेने सतत प्रयत्नशील असणे म्हणजे तुम्ही शिस्तीचे आहात. या शिस्तीत कोणतीही नवी गोष्ट शिकण्याकडे कटाक्ष असतो. त्यातून तुम्ही तुमच्या ज्ञानात भर घालत असता. म्हणूनच लहान मुलांच्या जीवनात जर योगसाधना आणली, तर ती आपोआप शिस्तप्रिय होतील. कारण योगसाधनेत काही विशिष्ट गोष्टी अत्यंत दक्षतेने कराव्या लागतात. त्यात सातत्य ठेवावे लागते. अचूकतेचा आग्रह धरावा लागतो. त्याशिवाय योगाचे परिणाम दिसून येत नाहीत. ज्या दक्षतेने योगाचे प्रशिक्षण दिले जाते ते पाहता तुम्ही शिस्तीपासून दूर जाऊ शकत नाही आणि एकदा का योगसाधना त्याच दक्षतेने केली, की तुम्ही बेशिस्त असणे अशक्य आहे. त्यामुळे योगसाधनेतून तुम्ही एकाच वेळी शिस्तप्रियही होता आणि सदोदित काही नवे शिकण्यासाठी प्रफुल्लित असता. नवे शिकण्यास उद्युक्त होता, हेच त्याचे यश आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक