शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 9

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:31 IST

आपल्या हातात काही नाही सगळे त्या उप्परवाल्याच्या हातात असे सांगितले की हे माणसाला पटते व त्यामुळे तो दैववादी होतो,नशिबवादी होतो.

- सदगुरू श्री वामनराव पै

देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे

आपल्या हातात काही नाही सगळे त्या उप्परवाल्याच्या हातात असे सांगितले की हे माणसाला पटते व त्यामुळे तो दैववादी होतो,नशिबवादी होतो. त्यात ज्योतिषी जे काही सांगतात व ते ही त्यांना पटते.मी नापास होणार आहे असे ज्योतिष्याने सांगितले तर मग मी अभ्यास कशाला करू किंवा ज्योतिषाने सांगितले मी पास होणार तरी मी अभ्यास केला नाही तरी चालेल असे मुलांना वाटते.मुळात मुलांना अभ्यासच करायचा नसतो व त्यामुळे ते ज्योतिषी काय सांगतात असे वागतात. थोडक्यात देवासकट सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे असे सांगितले तर ते लोकांना पटत नाही.लोक आम्हाला सांगतात वामनराव तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे पण जरी ते खरे असले तरी मनाला पटत नाही असे का? त्यावर मी नेहमी सांगतो नाहीच पटणार कारण इथे प्रयत्नवाद सांगितलेला आहे. आणि प्रयत्नवाद कुणाला हवा असतो.मनाची प्रवृत्ती ही नेहमी खालच्या दिशेने वहात असते त्यामुळे लोकांना नेहमी दैववाद पटतो, प्रयत्नवाद पटत नाही.मानवी जीवनांत दु:ख का? खंरतर याचे एकमेव कारण लोक दैववादी आहेत हे आहे.आयुष्यात ९० टक्के घटना आपल्या हातात असतात तर १० टक्के घटना या पराधीन असतात.पण लोकांचा असा समज असतो की सर्व काही दैवाधीन आहे,सर्व काही पराधीन आहे. आणि असे मोठमोठया लोकांनी सांगितल्यामुळे लोकांना तेच खरे वाटत असते.पण ते त्यांनी वेगवेगळ्या अर्थाने किंवा कोणत्या संदर्भात सांगितले आहे याचा कोणीच विचार करीत नाही.आयुष्यातील ९०  टक्के घटना आपल्या हातात आहेत म्हणूनच आम्ही सांगतो “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” माणूस दु:खी होण्याची अनेक कारणे आहेत.पण याचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान.अज्ञान हेच सर्वांच्या दु:खाचे मूळ आहे.जगातील सर्व समस्यांचे, दु:खाचे मूळ हे अज्ञान आहे.हे अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत माणूस सुखी होणे कठीण आहे.जीवनात बघा ज्या ज्या ठिकाणी ज्ञान असते त्या ठिकाणी सुख असते व ज्या ज्या ठिकाणी अज्ञान असते त्या ठिकाणी दु:ख असते.जीवनांत अज्ञान हे वेगवेगळया प्रकारचे असते.परमार्थात, प्रपंचात, धंद्यात अज्ञान असेल तर माणसाच्या वाटयाला दु:ख येते.कारण त्या गोष्टींबद्दल ज्ञान करून घेतले की सुख मिळते.संसार दु:खाचा होतो कारण अज्ञान.संसारात आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात.बायका स्वयंपाक करतात जर त्यांना स्वयंपाकाबद्दल ज्ञान नसेल तर त्यांना तो करता येणार नाही.कारण त्यासाठी स्वयंपाकाचे ज्ञान हे फार महत्वाचे आहे.जीवनविद्येने संसारात चूल व मूल या दोन्ही गोष्टींना फार महत्वाचे स्थान दिलेले आहे.इतरांनी चूल व मूल या गोष्टींना गौण स्थान दिलेले आहे.आज जगात ज्या समस्या आहेत त्याचे मूळ कारण म्हणजे चूल व मूल या गोष्टींना दिलेले गौण स्थान हे होय.