शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 8

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:32 IST

तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही.

- सदगुरू श्री वामनराव पैजीवनविद्या आत्मसात करतात ते सुखी होताततुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात मी दुस-यांच्या दोषांकडे कशाला पाहू  माझ्याकडे दोष काय कमी आहेत का.अशी दृष्टी जर असेल तर कोणीही दुस-याचे दोष पाहणार नाही. कोणीही दुस-यांची निंदा करणार नाही.अशी दृष्टी असेल तर दुस-यांची चेष्टाकुचेष्टा कोणीही करणार नाही.असा दृष्टीकोन देणारे किती लोक समजामध्ये आहेत. असा दॄष्टीकोन घेणारे लोक समजात किती आहेत.समजा असा दृष्टीकोन देणारा एखाद -दुसरा जर असेल तरी तो घेणारे किती जण आहेत.आज जीवनविद्या मिशनमध्ये आपण लोकांना अचूक मार्गदर्शन करत आहोत.हे अचूक मार्गदर्शन तुम्हांला इतरत्र  कोठेही मिळणार नाही.शिवाय हे मार्गदर्शन जीवनविद्या मिशन वारंवार देत आहे.यातील वारंवार हा शब्द अंडरलाइन करायचा.इतके असूनसुध्दा  सदगुरु सांगतात त्याप्रमाणे सर्व लोक करतात का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.कारण एकाने मला प्रश्न विचारला की, “महाराज जीवनविद्येत आलेले सर्व लोक सुखी होतात का? मी त्याला म्हटले नाही.जे लोक जीवनविद्या आत्मसात करतात ते लोक सुखी होतात.सदगुरुंनी सांगितल्याप्रमाणे जे लोक आचरण करतात ते लोक सुखी होतात.पण हे तत्वज्ञान या कानाने ऐकतात व दुस-या कानाने सोडतात त्यांच्याबद्दल आपण काय बोलावे.मला वाटते अशा लोकांबद्दल न बोललेच बरे.आम्ही सतत कर्मकांडावर अचूक असे मार्गदर्शन केलेले आहे तरी आमच्या मिशन मध्ये असलेले काही लोक देखील अजुनही कर्मकांडे करतात.असे लोक भितीपोटी हे सर्व करतात.पण सांगायला आनंद वाटतो की काही लोक आमच्या मार्गदर्शनानूसार सुधारले आहेत.त्यांनी निष्फळ कर्मकांडे करणे बंद केले आहे.एक काळ असा होता की आमचे नामधारक चार-पाच तास देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे रहायचे.कडेवर मूल असायचे पाऊस पडत असायचा तरी देखील ते अशा परिस्थितीत तासनतास रांगेत उभे असत.अशा परिस्थितीत जर मूल आजारी पडले, किंवा ती व्यक्ती आजारी पडली, त्याची बायको आजारी पडली तर डॉक्टरकडे जावे लागणार,पैसे खर्च होणार,त्याला दारिद्र येणार.आता या सर्व गोष्टींना जबाबदार कोण,याला जबाबदार केवळ ती व्यक्तीच असू शकते.शेवटी किती वेळ उभे रहाणार,शरीर थकणारच,गुडघ्यावर अति वजन आले की  ते त्रास देऊ लागतात.हे मी इथे का सांगतो आहे.माणसे विचार करत नाहीत, चिंतन करत नाही,एखाद्या गोष्टीच्या मुळाकडे जात नाहीत.आपल्या जीवनांत दु:ख का येत.खरंतर आपल्या दु:खाला कारणीभूत आपण आहोत की इतर कोणीतरी कारणीभूत आहेत.तुम्ही म्हणाल आपल्या दु:खाला इतर कुणीतरी कारणीभूत असू शकते का? तर हो दुसरे देखील कारणीभूत असू शकतात.काही लोक दुष्ट असतात.तुकाराम महाराजांना काही दुष्ट लोकांमुळे आयुष्यभर त्रास भोगावा लागला.ज्ञानेश्वर महाराजांना काही दुष्ट लोकांमुळे जन्मापासून त्रास भोगावा लागला.आता हा प्रकार वेगळा व आपल्या स्वत:च्या चुकीमुळे होणारा त्रास वेगळा.कधी कधीनैसर्गिक आपत्ती येते, धरणीकंप होतो, पूर येतो, पूरात घरे वाहून जातात तेव्हा अशा अस्मानी संकंटाना आपण काय करणार.पण दैववाद सांगितला की तो लोकांना लगेच पटतो पण तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगितले तर हे कसे काय म्हणून लोक आम्हाला  विचारतात.