शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वासनेचा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:30 IST

धर्म दृष्टीमध्ये बदल घडविण्याचे काम करतो.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

धर्म आणि विज्ञान यांचा तौलनिक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की विज्ञान ही एक विचार पद्धती आहे. निरीक्षण, प्रयोग, प्रचिती आणि सिद्धता या प्रक्रि यांच्या सहाय्याने निसर्ग सत्याचा घेतला जाणारा शोध म्हणजे विज्ञान. धर्माची तीन अंगे आहेत, कर्म, ज्ञान, आणि उपासना. सत्य, प्रेम, त्याग, आणि श्रद्धा हे धर्माचे चार पाय आहेत. पहिले तीन पाय आज दुर्बल झाले आहेत. चौथा पाय श्रद्धेचा तो देखील देवळा पुरताच मर्यादित राहिला आहे. धर्म म्हणजे आचार, धर्म म्हणजे विचार, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे शील, धर्म म्हणजे मर्यादा. जीवनात निंद्य काय आणि वंद्य काय हे धर्म सांगतो. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ ,आणि सर्वाहून परमात्मा श्रेष्ठ हे धर्माचे सार आहे.

विज्ञान आणि धर्म दोन्हीही आपआपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. धर्म हे अंतरंगाचे विज्ञान आहे. विज्ञान हा सृष्टीचा  धर्म आहे. विज्ञान हे सृष्टीचे ज्ञान असते, धर्म हे अंतरंगाचे भान असते. विज्ञान हे प्रयोग शरण आहे. धर्म हा तत्व शरण आहे. विज्ञान हे वैभवाचे प्रदर्शन आहे. धर्म हा जीवनाचे दर्शन आहे. धर्म हे आपले रूप असेल तर विज्ञान त्या वरचे वस्त्र आहे. सुखाने कसे जगावे हे विज्ञान सांगत असले तरी जगावे कशासाठी हे धर्मच सांगतो. धर्म दृष्टीमध्ये बदल घडविण्याचे काम करतो. स्वामी रामतीर्थ हे एकदा लाहोरच्या बाजारपेठेतून जात होते. रस्त्याच्या कडेला माडीवर एक लावण्यवती गणिका उभी होती. स्वामी तिच्याकडे एक टक बघतच बसले. बरोबर असणाऱ्या शिष्यांना वाटले, स्वामी तिचे सौंदर्य बघून मोहित झाले. गणिका देखील आश्चर्य चकित झाली. हा संन्यासी माझ्या रुपाने वेडा झाला की काय..? ती म्हणाली, स्वामीजी..         

हुस्न को जो बदनजर देखते है !  वो पहले अपना सर कलम देखते है !  

तिचे शब्द ऐकून रामतीर्थांची समाधी भंग पावली. स्वामी त्या गणिकेला म्हणाले,  मैया...! ना तेरे रुप से गरज, ना तुझसे गरज!हम तो हमारे मुसोहर की कलम देखते है...! तू इतकी सुंदर तर तुला बनवणारा ईश्वर किती सुंदर असेल. हेच मी समाधी अवस्थेत बघितले. दृष्टीचा विकास हेच धर्माचे उद्दीष्ट आहे.वर्तमान काळात भोगवाद प्रचंड बळावत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, भोगवादाच्या तळाशी वासनेचा ज्वालामुखी सतत धुमसत असतो. कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होईल व या देशाची सभ्यता व संस्कृती नष्ट होईल. हा ज्वालामुखी शांत करण्यासाठी धर्माची नितांत गरज आहे.

( लेखक के राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्र. 9421344960 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक