शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

संकल्पशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:51 AM

नीता ब्रह्माकुमारी १९१०मध्ये वैज्ञानिकांचा ग्रुप उत्तर ध्रुवावर संशोधनासाठी गेला होता. जहाजात ३५-४० लोक होते. प्रवासात कडाक्याच्या थंडीमुळे तयार झालेल्या ...

नीता ब्रह्माकुमारी१९१०मध्ये वैज्ञानिकांचा ग्रुप उत्तर ध्रुवावर संशोधनासाठी गेला होता. जहाजात ३५-४० लोक होते. प्रवासात कडाक्याच्या थंडीमुळे तयार झालेल्या बर्फात जहाज अडकते. कॅप्टननं सांगितलं, हे जहाज पुन्हा मार्गी लागायला तीन महिने लागतील. सर्व सोयी जहाजावर होत्या; पण जहाजातील लोकांना सिगारेटचे व्यसन होते. त्याचा साठा संपायला लागला. सर्वांच्या मनात प्रश्न उभारला, ही सिगारेट संपले तर आपले काय? तीन महिने कसे काढायचे? त्यांनी जहाजावरील कागद, कपडे जाळायला सुरू केले. त्या धुराने ते सिगारेटची इच्छा पुरी करू लागले. हे जेव्हा कॅप्टनच्या कानावर पडले, तेव्हा तो त्यास नकार देतो; पण ते म्हणाले, ‘खायला नाही मिळाले तरी चालेल; पण सिगारेट हवीच.’ कॅप्टन विचारात पडतो, असे केले तर कसे होणार? कारण जहाजावरचे दोरखंडही जळायला लागले होते. अशा परिस्थितीतून ते कसे बाहेर पडले व आपल्या स्थानी पोहोचले, याचा वृत्तांत कॅप्टनने वृत्तपत्रात लिहिला. हा वृत्तांत वाचताना अमेरिकेतील चेन स्मोकर स्टुवर्ड पॅरीच्या मनात आले, मी या जहाजावर असतो तर माझीही अशीच अवस्था असती का? कारण त्याने कित्येक वेळा हे व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता; परंतु यश आले नव्हते. जेव्हा त्याने स्वत:ला तेथे बघितले व विचार केला तेव्हा मनात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. त्याने ईश्वराला सांगितले, तू ह्या जगात आहेस व तुझा माझ्यावर विश्वास असेल, तर आता सिगारेट ओढण्याचे सोडतो; पण जेव्हा हा विश्वास संपेल तेव्हा हीच सिगारेट पुन्हा माझ्या हातात असेल. पॅरी सांगतो की, ३० वर्षे झाली, आजही ती अर्धी सिगारेट अ‍ॅश ट्रेत आहे. ह्या काळात कितीतरी प्रसंग आले; पण त्या सिगारेटला हात लावला नाही. हे कसे घडले? मानवी मन अद्भुत शक्तींनी भरलेय; पण आपण त्या शक्तींचा वापर करीत नाही. विचार करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे; पण त्या विचारांत शक्ती असणे महत्त्वाचे. संकल्पामध्ये दृढता असेल, त्या संकल्पाला वास्तवात आणण्याची चिकाटी असेल तर सर्व काही साध्य आहे.