शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

म्हणोनिया शरण जावे । सर्व भावे देवासी ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 20:22 IST

देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे परम कल्याण होणार नाही.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी

अध्यात्म मार्गात देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे कल्याण होत नाही. तुकाराम महाराज आग्रहाने सांगतात - म्हणोनिया शरण जावे । सर्व भावे देवासी ॥फक्त महाराजच सांगतात असे नाही तर गीता माऊली देखील म्हणते -तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत ।देवाला शरण गेल्याशिवाय साधकाचे परम कल्याण होणार नाही. जीवाने अत्यंतिक दु:ख निवृत्तीकरिता आणि परमानंदाच्या प्राप्तीकरिता देवालाच शरण जायला पाहिजे. शरण तरी का जायचं..? तर गीता माऊली म्हणते -दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।मामेव ये प्रपध्यन्ते माया मेतां तरिन्त ते ॥भगवान म्हणतात, जे मला शरण येतात ते माया नदी तरुन जातात. आता देवाला शरण तरी कसे जावयाचे..? तर महाराज म्हणतात, सर्व भावे..! 

ज्ञानेश्वर महाराज हे सर्वभावे या पदाचे स्पष्टीकरण करतात -तया अहं वाचा चित्त अंग । देऊनिया शरण रिघ ॥महोदघी का गांग । रिघाले जैसे ॥गंगेचं पाणी आपल्या जवळचं सर्वस्व अर्पून जसं समुद्रात मिसळतं तसं आपल्या जवळील सर्वस्व देवाला अर्पण करावं. सर्वस्व म्हणजे काय..? तर अहं..! म्हणजे अहंकार हा अर्पण करता आला पाहिजे. परमात्मस्वरु पात तो स्थिर करता आला पाहिजे. मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी प्राण आहे, असं न म्हणता मी वासुदेव तत्वता या भूमिकेवर आलात तर अहंकार जाईल. अहं ब्रह्मास्मि ही ब्रह्मरु पता सिद्ध व्हावी लागेल नंतर शरणागतीसाठी दुसरे समर्पण आहे. वाचा..! तुकाराम महाराज म्हणतात -तुका म्हणे वाचा वाहिली अनंता ।बोलायचे आता काम नाही ॥वाचा समर्पण करता आले पाहिजे. मुखाने फक्त भगवंताचेच नाम घेणे. हरि बोला हरि बोला, नाही तरी अबोला. साधकाला असं जीवन जगता आलं पाहिजे. तिसरं समर्पण आहे चित्ताचं. चित्त देवाला देणे म्हणजे आपले अंत:करणसुद्धा देवालाच समिर्पत करता आले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात -माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही ॥धरोनिया बाही भव हा तारी दातारा ॥देवाचे चरणकमल ह्रदयात सर्व काळ धारण करणे. याला चैत्तीक शरणागती असे म्हणतात आणि शेवटची शरणागती सांगितली आहे अंग. शरीर देवाला समर्पण करावे लागेल. मनासहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ॥यालाच सर्वभावाने शरण जाणे असे म्हणतात. शरणागतीत मी देवाचाच आहे असा भाव असावा मगच तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा..!

( लेखक हे स्वत: राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, मोबाईल क्र. 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक