शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:57 IST

एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो.

- प्रा. डॉ. संदीप ताटेवार

एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे म्हणजे चिंतन होय. सद्गुुरू वामनराव पै म्हणतात की चिंतन हा चिंतामणी आहे. ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी आपल्याला हा चिंतामणी मिळवून देतो. देवाचे चिंतन केले तर दैवीगुण म्हणजे प्रेम, आनंद, मौन, शांती या गोष्टी आपल्यामध्ये रुजतात. राक्षसाचे चिंतन केल्यास क्र ोध, हव्यास, अहंकार, मत्सर या गोष्टी आपल्यामध्ये रुजतात म्हणूनच परमेश्वराचे चिंतन आपल्याला जीवनाच्या भवसागरातून सुखरूप पार पाडत असते. कोणत्याही परिस्थिती मध्ये आपण केलेला पाहिला विचार महत्त्वाचा ठरतो कारण त्यानंतरची विचारांची शृखंला त्याप्रमाणे निर्माण होते.जेव्हा पाहिला विचार सकारात्मक असतो तेव्हा त्यानंतरचे चिंतन सकारात्मकच होत जात असते व माझं चांगलं होणार हा भाव आपल्या बाह्यमनातून अंतर्मनात मूळ धरून बसतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. जीवनामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्याचे आपण चिंतन करायला पाहिजे. जेव्हा आपला भूतकाळ चांगला नसतो, वर्तमानकाळ सुद्धा चांगला नसतो तेव्हा माझा भविष्यकाळ कसा चांगला राहील याचे चिंतन महत्त्वाचे ठरते. चिंतनाचे प्रमाण, त्याची तीव्रता व त्याचा दर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक आहे यावर आपले भविष्य अवलंबून असते. अध्यात्मामधील निसर्ग नियम सांगतो की ज्या गोष्टीचे आपण चिंतन करतो त्या गोष्टी निसर्गाकडे विचारामार्फत परावर्तीत होत असतात व जेव्हा त्या निसर्गाकडे पोहचतात, तेव्हा निसर्ग त्याला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे चिंतन हे सजगपणे करायला पाहिजे. जेव्हा आपण वारंवार एखाद्या गोष्टीचे चिंतन करतो तेव्हा ती आपल्या अंतर्मनात रुजते व त्याप्रमाणे आपल्या जीवनात गोष्टी घडत जातात.चिंतन हे परिस्थितीचे न करता त्यावरील उपायाचे करायला पाहिजे म्हणजेच परिस्थितीवर मात करता येते; मात्र बरेचदा आपण आपली शक्ती ही परिस्थितीचे चिंतन करण्यात व त्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यात घालवितो व त्यामध्ये आपली आत्मिक शिक्त खर्ची पडते. त्यामुळे आपण परिस्थितीसमोर दुर्बल होतो व त्यावर मात करू शकत नाही. चिंतन चांगल्या गोष्टीचे करायचे की वाईट गोष्टीचे हा विकल्प आपल्यालाच ठरवायचा असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की, जसे तुम्ही चिंतन कराल तसे तुम्ही व्हाल; दुबळे किंवा तेजस्वी!.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक