शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिचेनि योगे देव..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 18:10 IST

जीवन व्यवहार्थ केलेले प्रत्येक कर्म भगवंताला आवडेल असेच करणे म्हणजे भक्ती होय.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

श्रीसमर्थ रामदास स्वामी हे भक्तीमार्गी संत होते. समाज जीवनात भक्तीचाच प्रचार आणि प्रसार करणे हेच श्रीसमर्थ संप्रदायाचे प्रधान प्रयोजन होते. श्रीमद् ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थांनी भक्तीमार्गाचेच विवेचन केले आहे. ग्रंथारंभीच  श्रीसमर्थ म्हणतात -

ग्रंथानाम दासबोध । गुरु शिष्यांचा संवाद ॥येथ बोलिला विशद । भक्तीमार्ग ॥

श्रीमद् ग्रंथराज दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. शिष्यांनी विचारलेले प्रश्न व श्रीगुरूंनी दिलेली उत्तरे, यातूनच हा ग्रंथ साकारला आहे. अध्यात्मशास्त्रांत ईश्वरप्राप्तीचे जे विविध मार्ग सांगितले त्यात कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग व भक्तीयोग अशा विविध मार्गांचा समावेश आहे. संत कोणत्याही विशिष्ट मार्गाचे आग्रही नसतात. साधकाच्या अधिकारानुसार ज्याने त्याने आपला मार्ग निवडावयाचा असतो. असे असले तरी प्रापंचिकासाठी भक्तीमार्ग हा सहज सुलभ आहे. प्रापंचिक साधकाने श्रीसमर्थांना प्रश्न विचारला, गुरुदेव..!आमच्यासाठी दुःखमुक्तीचा व ईश्वरप्राप्तीचा मार्ग सांगा ना..? श्रीसमर्थ म्हणाले -

भक्तीचेनि योगे देव । निश्चये पावती मानव ॥ऐसा आहे अभिप्रावो । इयें ग्रंथी ॥शुद्ध भक्तीचा निश्चयो। शुद्ध ज्ञानाचा निश्चयो ॥ आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥

या ठिकाणी भक्तीचेनी योगे देव। या पदात योग हा शब्द आला आहे. युज् धातूपासून हा शब्द बनला आहे. युज् म्हणजे जोडणे. भक्तीच्या सहाय्याने  परमेश्वराशी जोडले जाणे याचे नाव भक्तीयोग. आता आपण म्हणाल, भक्ती म्हणजे काय..? श्रीमद् भागवतात नवयोगींद्रांनी निमीराजाला भक्तीचे लक्षण सांगितले आहे. योगींद्र म्हणाले, राजा..!

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वाऽनुसृतः स्वभावात् ॥करोमि यद् यद् सकलं परस्मै: । नारायणायेति समर्पयामि ॥

काया, वाचा, मन, बुद्धी व अन्य इंद्रियांनी होणारी सर्व कर्मे परमेश्वराला समर्पण करणे म्हणजेच भक्ती. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की, परमेश्वराला कर्म समर्पण कसे करणार.? या प्रश्नाचे उत्तर असे की, कर्म समर्पण करणे म्हणजे ज्या कर्माने ईश्वराला संतोष होईल असेच कर्म करणे. श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात -

देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावे तेणेंची रीती ॥येणे करिता भगवंती । सख्य घडे नेमस्त ॥आपण तैसेची वर्तावे । आपणांसि तेचि आवडावे ॥ मनासारिखा होता स्वभावे । सख्य घडे नेमस्त ॥

जीवन व्यवहार्थ केलेले प्रत्येक कर्म भगवंताला आवडेल असेच करणे म्हणजे भक्ती होय. या पुढील निरुपण पुढील लेखात बघू..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. ९४२१३४४९६० )    

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक