शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शब्दांमुळे आचार-विचारात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:21 IST

व्यक्ती जसा विचार करतो त्या प्रमाणेच फलप्राप्ती होत असते.

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलया कोय...जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय...

व्यक्ती जसा विचार करतो त्या प्रमाणेच फलप्राप्ती होत असते. प्रत्येकाचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक व द्वेषरहित असणे गरजेचे आहे. चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी सर्व मनुष्य प्राण्यात आढळतात. तथापी मानवी चक्षू हे फक्त दुसऱ्या व्यक्तीत कोणते अवगुण आहेत. याचाच शोध घेतात. उक्त दोह्यात संत कबीरांनी अंर्तमनाचा वेध घेताना सांगितले आहे की, वाईट बाबीचा शोध घेण्यासाठी गेलो तर मला कु णीही वाईट दिसले नाही. याउलट मी स्वताच्या मनाचा विचार केला तर त्यापेक्षा कू णीही वाईट नाही असे आढळुन आले. बहूतांश नात्यांमध्ये येत असलेला दुरावा हा एकमेकातील दोष व अवगुण याची होत असलेली वाच्यता यामुळे येत आहे. अवगुण दुर्लक्षित करुण सद्गुणांची स्विकृती केल्यासच प्रेम, माया, वृद्धींगत होत असते. रहीमांच्या दोह्यात ही गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित केली आहे. ते म्हणतात,

रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाये..टुटे से फिर ना जुटे, जुटे गाँठ परि जाये...

दैंनदिन जीवनात समाजात वावरत असताना शब्द आणि कृती विचारपुर्वक ठेवणे गरजेचे आहे. शब्दांची धार ही शस्त्रांच्या धारेपेक्षा तेज असते, म्हणुनच म्हटले आहे, शब्द हे शस्त्र आहे. त्याचा जपुन वापर करा. अपशब्द वापरामुळे महाभारत घडले हे जाणकार सांगतातच. प्रेमपुर्वक शब्द हे भविष्यातील मोठे संकट टाळू शकतात. शब्दांची फुकंर घालुन जखमा बऱ्या होत नाहीत. त्यांचा ठणका कमी होतो. असे व.पू. यांनी देखील म्हटंले आहे. एखाद्याची अगतिकता, दु:ख, आघात जर शब्दाने शिथील होत असतील तर सौहार्दपुर्वक वातावरणात आपण संवाद साधण्यास काय हरकत आहे.

प्रत्येकाकडे शब्दांची शक्ती अमर्याद  असुनही तिच्या वापराबाबत मात्र अनभिज्ञ आहोत. तसे पाहिल्यास जिभेद्वारे होणारे शब्दोच्चार हे धनरुपी असतातच. फक्त त्यात माधुर्य असणे गरजेचे. अन्यथा विपर्यास होण्यास वेळ लागणार नाही. शब्दाचे उगमस्थान हे मुलत: मनात, हदयात आहे. आणि त्यास चांगल्या बुद्धीची जोड असणे गरजेचे आहे. म्हणुन तुकोबा माऊली म्हणतात,

मनाचे संकल्प पावतिल सिद्धी...जरी राहो बुद्धी त्याचे पायी... 

चांगल्या विचारांचे उगम हे चांगल्या बुद्धीतच होतात. हे नव्याने सांगणे नको. मानवी मनाशी तर संवाद देहरुपाने चालु असतोच. शब्दामुळे विचार, आचार आणि आचरण बदलते. कळत नकळत शब्द हे संस्कार क रीत असतात. त्यावरुन व्यक्तीमत्व ठरत असते. मानवी नातेसंबध आणि शब्द यांची मोठी सांगड आहे. शब्दाना जसे वजन, किंमत आहे तशी धार देखील आहे. म्हणुन जाणकारांनी म्हटले आहे, शब्दांना आधार हवा, धार नको. शब्दांनी परिवार, नाती आणि समाज जोडला जातो. तसाच तोडला जातो. शब्दाची आणि मनाची कायम गट्टी जमलेली असते. विचार शब्द आणि कृती नैतिक व्हायला पाहिजे. तरच ते जीवनात समग्रतेशी एकरुप होऊ शकतात.

- भालचंद्र संगनवार

(लेखक लातूर येथे वरीष्ठ भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक