शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भेटीचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:44 IST

माणसं अलीकडे माणसांना भेटतच नाहीत, असं कधी-कधी वाटतं. माणसांच्या गर्दीत माणूस माणसं शोधताना दिसतो. काय शोधतात? माणूसपण. मनन, चिंतन ...

माणसं अलीकडे माणसांना भेटतच नाहीत, असं कधी-कधी वाटतं. माणसांच्या गर्दीत माणूस माणसं शोधताना दिसतो. काय शोधतात? माणूसपण. मनन, चिंतन आणि आपलंपण, भौतिक शोध खूप झालेत, बोध हरपला असं वाटतं. अशी भेट दुर्मीळ झाली. भेट होत नाही, असंही नाही, पण त्यात ओढ नाही. भेटीत नजरेच्या धडका होतात. घातक शब्दांचा संघर्ष उभा राहतो. भेटीत संवाद नाही. जिव्हाळा नाही, आर्तता नाही. संस्कार व उद्बोधन नाही, आनंदाचे तरंग निर्माण होत नाही. म्हणून चक्रधर भेटीचं स्वरूप आपल्या सूत्रातून सांगतात.

‘‘भ्रमत भ्रमता भेटी: कां आपजौनिभेटी: एकमेका भेटलेया हे भेटलेयाचा पाडु जाए’’ या सूत्राचा केंद्रबिंदू ‘हे’ अक्षर महत्त्वाचं आहे. ‘हे’चा अर्थ परमेश्वर म्हणजे आनंद असा आहे. भेटीच्या मिलनात आनंद वाटला पाहिजे. उगीच भेटलो असं न म्हणता, बर भेटलो, असं म्हणता आलं पाहिजे. दोन चांगल्यांच्या भेटीत तो सोहळा जन्माला येतो. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या सहा विकारांचं प्रक्षेपण देहबोलीतून होत असतं. डोळ्यातून कामाचा संचार होतो, तेव्हा कामाला काम, क्रोधाला क्रोध, मदाला मद व मत्सराला मत्सर भिडतात व प्रेमाच्या संचाराने विकार निर्विकार होतात. मग ‘मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे’ असं वाटायला लागतं. चंद्र जवळ आला की, सागराच्या लाटा थयथय नाचायला लागतात. अशा स्वस्थचित्ताच्या लोकांनी सतत भ्रमण करावं, हाच धर्माचा खरा हेतू आहे. वारं फिरतं गवताची पेरणी होते. पाणी वाहतं प्राण्यांची तहान भागवतं. सज्जन फिरतात, विवेकाचं वाटप होतं. सज्जनांची भेट ही वेधाने बोधाची घेतलेली ही भेट आहे. ज्ञानाने विरक्तीला व विरक्तीने भक्तीला भेटावं, भेटल्याने दक्षता योग्यता वाढते.

- बा.भो. शास्त्री