शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गुण हेच विनाशाचे कारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:53 IST

दुसºयाचे दुर्गुण पाहण्याच्या चुकीच्या सवयीमुळे माणूस आपल्या आणि समाजाच्या विनाशाचे कारण बनतो. 

 माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसºयाचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसºयातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वत:मध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वत:चा चांगुलपणा आणि दुसºयांचे दुर्गुण नेहमीच दिसतात. दुसºयाचे दुर्गुण पाहण्याच्या चुकीच्या सवयीमुळे माणूस आपल्या आणि समाजाच्या विनाशाचे कारण बनतो. 

दुर्गुणामुळे मनुष्य आई-वडील, बहीण- भाऊ इतकेच नव्हे तर गुरूपासूनही दुरावतो. स्वत:मध्ये अनेक दोष असतानाही मनुष्य इतरांचे दोष पाहत बसतो. प्रत्येकाच्या मनात, हृदयात आणि  अंत:करणात डोकावून पाहिले की, कुणातही काही ना काही ऐब दिसून येतील.  कुणाच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष आहेत. मात्र, तीच कृती स्वत:वर केल्यास दुसºयाच्या अंतकरणात दिसणारे दोष स्वत:च्याही अंतकरणात आणि मनात निश्चितच दिसतात. स्वत:मध्येही अनेक उणिवा जाणवतात. त्यामुळे दोष पाहण्याची कृती स्वत: आणि स्वत:च्या मनापासून केल्यास आपणाला कुणातही दोष दिसून येणार नाहीत.  इतरांच्या मनाच दर्पणात डोकावून पाहण्यापेक्षा स्वत:च्या मनात डोकावून पाहील्यास आपणाला इतरांमधील दुर्गुण दिसणार नाहीत. मन चक्षू दुसºयांचे नव्हे तर आपलेच दुर्गुण पाहण्यासाठी आहेत.  दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलात आणि नको तितका वेळ खर्च केलास तर आपलंच अहीत होते. या उलट स्वत:च्या मन चक्षूने स्वत:चेच अवलोकन केले असते तर आपल्यातील दुर्गुण नक्कीच सुधारता येतात. मात्र, प्रत्येक मुनष्याची ... मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही.

- शुभांगी नेमाने

शिक्षिका, जागृती ज्ञानपीठ, आंबेटाकळी ता. खामगाव.

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक