शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जीवनविद्या : वसा संतकार्याचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:38 IST

पसायदानातून जगाच्या सुखासाठी भव्य व दिव्य प्रार्थना जन्माला आली.

 

अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक॥ 

या संताच्या महान कार्याचा झेंडा सदगुरू श्री वामनराव पै यांनी खांद्यावर घेतला व "हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थांने समृद्ध व्हावे व पुढे जावे" या संकल्पपुर्ती साठी जीवनविद्या मिशन या संस्थेच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांच्या मनांत हा संकल्प रूजविला. 

सर्वे सुखिन् सन्तु, सर्वे सन्तु निरामय:  या भगवंताचा विचारसर्व सुखी, सर्व भूती, संपुर्ण होईजे या दिव्य संकल्पातून मानवी मनात परिवर्तनाचे बीजारोपण करण्यासाठी या विश्वात्मक देवाकडे आर्त मागणी केली. आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥तोषूनी मज द्यावे। पसायदान हे॥

या पसायदानातून जगाच्या सुखासाठी भव्य व दिव्य प्रार्थना जन्माला आली.

याच पसायदानाचे मनात सतत स्मरण राहावे व मानवी जीवन सुख, शांती व समृद्धीने भरून जावे, याच सदभावनेतून  "हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. या विश्वशांतीसाठी निर्माण झालेल्या विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थनेतून मानवी मनामनांत सदगुरूंनी आनंदी व विधायक विचारांची बीजे बिंबवली व रूजविली. 

वेद उपनिषदांतील शुध्द ज्ञान भगवंताच्या भगवत् गीता या महान तत्वज्ञानाने जगात अ‍वतिर्ण झाली. हे दिव्य ज्ञान सर्व सामान्य मराठी जनतेला ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ रूपाने प्राकृतमध्ये दिले. हेच दिव्य असे ईश्वरी ज्ञान सर्व संतानी अभंगाच्या रूपाने साध्या सोप्या मराठी भाषेतून समाजापर्यंत पोहचविले. 

आज संगणकीय युगात या पाकृत ओव्या व पद्यातल्या अभंगातील गुढ व गुह्य आजच्या युगाला विशेषत: तरूणाईला कळावे, या तीव्र तळमळीने सदगुरू श्री वामनराव पै यांनी किर्तन व प्रवचनांतून संतांच्या वचनातील गुह्य साध्या सोप्या मराठमोळ्या भाषेत समाजापर्यंत पोहचवू लागले. लोकांना ती आवडू लागली. हे तत्वज्ञान मोठ्याप्रमाणात लोकांपर्यंत पोहचावे म्हणून लोकाग्रहास्तव त्यांनी ग्रंथ लेखन सुरू केले.

त्यातूनच ज्ञानेश्वरीचे सार असणारे महान ज्ञानामृत व नामामृत सर्वसामान्य जनताजनार्दनापर्यंत पोहचून मानवाचा उध्दार व्हावा, या शुध्द व पवित्र हेतूने अगाध ज्ञान देणारा ज्ञानेशांचा संदेश व नामाचा महिमा व सामर्थ्य मुक्त कंठाने गाणारा नामाचा नंदादीप हे ग्रंथ सदगुरू श्री वामनराव पै यांनी जनताजनार्दनाला समर्पित केले.

महान तत्वज्ञानांचा, महान संदेशांचा, महान संस्कृतीचा व अमृत विचारधनांचा हा समृद्ध, शाश्वत, कल्याणकारी दिव्य संतवारसा सदगुरू श्री वामनराव पै यांनी अंगिकारला व संतकार्याचा पाईक होऊन त्यांनी स्वत:चा देह चंदनासारखा झिजवून किर्तन, प्रवचन, व्याख्याने व ग्रंथरूपाने जगाला शांती सुखाचा राजमार्ग दिला.

-संतोष तोत्रे

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक