शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik : मना घडवी संस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 06:27 IST

आईवडील हेच आपले खरे देव. कारण देतो तो देव हे त्यामागचं अगदी साधं आणि सोपं गणित आहे. जसं आपले आईवडील आपले देव आहेत तसंच आणखी कोण कोण आपले देव हे आपण या लेखात पाहणार आहोत.

- प्रल्हाद पैआईवडील हेच आपले खरे देव. कारण देतो तो देव हे त्यामागचं अगदी साधं आणि सोपं गणित आहे. जसं आपले आईवडील आपले देव आहेत तसंच आणखी कोण कोण आपले देव हे आपण या लेखात पाहणार आहोत. आईवडिलांप्रमाणेच आपल्या आयुष्यात आपल्याला ज्ञान देऊन समृद्ध करणारे आपले शिक्षक अथवा तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर तुमचे टीचरदेखील तुमचे खरे देव आहेत बरं का. कारण आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या या टीचरमुळेच. मग तुम्हाला अगदी एबीसीडी शिकवणाऱ्या तुमच्या टीचरपासून ते अगदी तुम्ही लहानाचे मोठे झाल्यावर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सगळं काही मार्गदर्शन करणारे सारे टीचर्स तुमचे देव आहेत. म्हणूनच दररोज तुमच्या शिक्षकांना मनातल्या मनात थँक्स म्हणायला मुळीच विसरू नका. मग करणार ना तुमच्या सर्व टीचर्ससाठी कृतज्ञता व्यक्त? ज्ञान देऊन तुम्हाला समृद्ध करणाºया टीचरप्रमाणे आणखी एक तुमच्या आयुष्यातील खरा देव तुम्हाला माहीत आहे का? बघा बरं. तुम्ही कुठे राहता, तुमची ओळख नेमकी कोणामुळे आहे. तुम्ही ज्या राष्ट्रात राहता ते राष्ट्र तुम्हाला नागरिकत्व देतं. तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता त्या राष्ट्रावरून तुमची ओळख ठरते. म्हणूनच आपला भारत देश हा तुमचा देव आहे. राष्ट्र हा जर देव असेल तर या राष्ट्राची भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही सर्व मुलं भारतीय आहात, कारण तुम्ही भारतात जन्माला आला आहात. राष्ट्राची प्रगती तेव्हाच होते जेव्हा त्या राष्ट्रात राहणारी माणसं प्रगतीपथावर जातात. तुम्ही विद्यार्थी आपल्या भारताचे उद्याचे नागरिक आहात. म्हणूनच आपल्या भारताविषयी आपल्या मनात सतत कृतज्ञ असायला हवं. शिवाय एक उत्तम नागरिक म्हणून तुमच्या कर्तव्यांबाबत नेहमी जागरूक असायला हवं. तुमची राष्ट्राबाबत कोणती कर्तव्यं तुम्ही पाळायला हवीत, हे आपण पुढील लेखात पाहूया.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक