शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

देवभीरू होऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 05:13 IST

आजकाल लोक देवाबद्दल जी चर्चा करतात, म्हणजे जर तुम्ही मंदिर, चर्च, मशीद किंवा इतर कुठल्या प्रार्थनास्थळी जाऊन आठवड्याचा त्याचा हप्ता दिला नाही, तर तो तुमच्यावर रागावणार, तुमच्या मुलांना रोगिष्ट करणार आणि तुमच्या धंद्याचे तीन तेरा करणार.

- सदगुरू जग्गी वासुदेवआजकाल लोक देवाबद्दल जी चर्चा करतात, म्हणजे जर तुम्ही मंदिर, चर्च, मशीद किंवा इतर कुठल्या प्रार्थनास्थळी जाऊन आठवड्याचा त्याचा हप्ता दिला नाही, तर तो तुमच्यावर रागावणार, तुमच्या मुलांना रोगिष्ट करणार आणि तुमच्या धंद्याचे तीन तेरा करणार. थोडी-फार जाण असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अशा ठिकाणी जावंसंदेखील वाटणार नाही. दैवी तथ्य अशा बालिशपणाने आपण चित्रित केले आहे.देवाला घाबरणारे होऊ नका. दैवी गोष्टी भयभीत होऊन तुम्ही शोधू शकणार नाही. जे काही तुम्ही करत आहात, जर ते भीतिपोटी करत असाल, तर नक्कीच त्यातून तुमचं कल्याण होणार नाही. अंतत: त्याचे परिणाम तुमच्यासाठी हितावह असणार नाहीत. जर भय तुमच्या समोर आलं, तर त्याच्याकडे पाहा आणि व्यवस्थित हाताळा. तुमच्या भयाचा मूळ आधार काय? तुमच्या मर्यादा हाच भयाचा मूळ आधार आहे. ‘काय होईल’ हाच भीतीचा मूळ आधार आहे, पण शेवटी तुम्हाला काय होणार? फार तर एक दिवशी तुम्ही मरणार. म्हणून तुमचे आयुष्य संपूर्णपणे जगा.तुम्हाला खरोखर मनापासून जे काही करायचं आहे, त्या गोष्टी करा. शेवटी काय होणार आहे़ कोणाला माहीत? पण काही केल्या एक दिवस तुम्ही मरणार हे तर नक्की, प्रश्न केवळ हा आहे, आज की उद्या, एवढंच.जर या भीतिपोटी, तुमचं मन ज्याच्यासाठी तळमळतंय ते केलं नाहीत, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे निर्माण करायचंय ते निर्माण केलं नाहीत, तर तुम्ही तुमचं आयुष्य सुरू होण्याआधीच वाया घालवाल. म्हणून देवाकडे ‘मला काही नको होऊ दे, मला काही नको होऊ दे’ अशा प्रार्थना करू नका. माझ्या जीवनात सर्वकाही घडू दे, अशी प्रार्थना आणि याचना करा. तुमच्या जीवनात सर्वकाही घडू द्यात! प्रत्यक्ष जीवन तुमच्या आयुष्यात घडो!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक