शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
2
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
3
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
4
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
5
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
6
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
7
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
8
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
9
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
10
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
11
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
12
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
13
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
14
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
15
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
16
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
17
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
18
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
19
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?

ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 03:16 IST

या नवरात्रात नवविध भक्ती करेन. श्रवण, स्मरण करतेच, पूजनही करेन. मनोमन तिची पूजा करेन.

- शैलजा शेवडे

नवविध भक्तीचे करीन नवरात्रकरोनी पोटी मागेन ज्ञान पुत्रआईचा जोगवा, जोगवा मागेन

या नवरात्रात नवविध भक्ती करेन. श्रवण, स्मरण करतेच, पूजनही करेन. मनोमन तिची पूजा करेन.

देवीची मानसपूजा

ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये,पायघड्या या स्वागत उत्सुक, प्रसन्नवदने ये ।ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये,मानसपूजा तुझी मांडली, भक्तवत्सले ये ।बैस गं आई चौरंगावर,पाणी घालते, पदकमलांवर,आनंदाच्या लहरी केवळ,स्पर्श तुझ्या चरणांचा दे,ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।आई तुला गं स्नान घालते,धूप दीप, फळं फुलं अर्पिते,गंगायमुना नेत्री दाटल्या,भावपूर्ण प्रणिपात घे, ये अंबे ये,माझ्या मनमंदिरी ये ।आज आई गं तुला नटविते,भरजरी साडी, वेणी देते,अलंकार घे सौभाग्याचे,आरशात बघ, हास्य दे,ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।तुझ्याचसाठी, रांधिली मी गं,पुरणवरण, अन खीर पक्वान्नं,जेव गं आई आनंदाने,तृप्तीची मग पोच दे,ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।आई तुझी ही लेक बावरी,रिझविण्या तुज गाणी गाई,आनंदाने नाचही मग करी,कौतुकाने ताल दे,ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।विश्वजननी, गिरिजा तू गं,तुझ्यामुळे, अन तुझीच मी गं,तुझ्याच ठायी अर्पियते गे,सर्व काही दुर्गे,ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।उठता, बसता, फिरता चित्ती,एक जाणीव तुझीच भक्ती,प्रमाद माझे अनंत तरीही,पदरी मजला घे,ये अंबे ये, माझ्या मनमंदिरी ये ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक