विहिरीत पडून शेतक-याचा मृत्यू!

By Admin | Updated: May 16, 2017 19:46 IST2017-05-16T19:46:54+5:302017-05-16T19:46:54+5:30

मानोरा (वाशिम): दापूरा येथील शेतकरी रामहरी नत्थुजी चौधरी (७0) यांचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना १६ मे रोजी घडली.

The well-being of the farmer dies! | विहिरीत पडून शेतक-याचा मृत्यू!

विहिरीत पडून शेतक-याचा मृत्यू!

ऑनलाइन लोकमत
मानोरा (वाशिम) : स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या दापुरा येथील शेतकरी रामहरी नत्थुजी चौधरी (वय ७० वर्षे) यांनी आपल्या स्वत:च्या शेतात खोदकाम सुरू असणाऱ्या विहिरीत वाकून पाहिले. यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले. उपचारादरम्यान त्यांचा १६ मे रोजी मृत्यू झाला.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी दापुरा येथील शेतकरी चौधरी यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. त्यांनी विहिरीत वाकून पाहिले असता तोल जाऊन ते आत पडले. त्यांच्या छातीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा १६ मे रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय अहवालावरून मानोरा पोलिसांनी आज मर्ग दाखल केला आहे. 

 

Web Title: The well-being of the farmer dies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.