विदर्भ आत्मबळ यात्रेचे सोमवारी वाशिम जिल्ह्यात होणार आगमन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:16 IST2018-02-04T21:01:00+5:302018-02-04T21:16:20+5:30
वाशिम : विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतक-यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली आहे. या यात्रेचे आगमन ५ फेब्रुवारीला वाशिम, मंगरूळपीर येथे होत असून विदर्भप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भ आत्मबळ यात्रेचे सोमवारी वाशिम जिल्ह्यात होणार आगमन!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विदर्भाची सद्य:स्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतक-यांचे विविध प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद यासह इतर प्रश्नांवर विदर्भातील जनतेची मते जाणून घेण्यासाठी काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ काढली आहे. या यात्रेचे आगमन ५ फेब्रुवारीला वाशिम, मंगरूळपीर येथे होत असून विदर्भप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांमधून भ्रमण करणारी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ प्रथम टप्प्यात, विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील जनतेची आस्था असलेल्या ११ ठिकाणी भेटी देणार आहे. यामाध्यमातून विदर्भाबद्दल जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. शेतकºयांना आत्मबळ देण्यासाठी, त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व बेरोजगार युवकांचे परजिल्ह्यांमध्ये रोजगारासाठी होणारे स्थलांतरण थांबविण्यासाठी यामाध्यमातून उद्बोधन केले जाणार आहे. मंरूळपिरच्या श्री बिरबलनाथ संस्थानमध्ये ५ फेब्रुवारीला ही यात्रा येत असून त्यानंतर वाशिम येथील जनतेशी संवाद साधला जाणार आहे. विदर्भप्रेमींनी यात्रेच्या स्वागतासाठी व आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.