एकलारा ग्रा.पं.चे दोन सदस्य अपात्र
By Admin | Updated: July 4, 2014 00:03 IST2014-07-03T23:48:18+5:302014-07-04T00:03:42+5:30
मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम १४ नुसार सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी पारित केला आहे.

एकलारा ग्रा.पं.चे दोन सदस्य अपात्र
मानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत गटग्रामपंचायत वाटोद, गुंडी, एकलारा येथील ग्रा.पं.सदस्य सविता मिलींद भगत व पंचफुला लक्ष्मण शिंदे यांचे सदस्यत्व मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम १४ नुसार सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी २ जुलै रोजी पारित केला आहे.
प्राप्त माहितीनुसार गट ग्रा.पं. वाटोद, गुंडी, एकलारा येथील प्रेमदास गुलाब चव्हाण यांनी ग्रा.पं.सदस्या पंचफुला लक्ष्मण शिंदे यांचे पती लक्ष्मण रामजी शिंदे यांनी गट क्र. ५४ ई वर्ग जमिनीवर ६0 क्षेत्रफळावर अतिक्रमण केले असल्याने तसेच सविता मिलींद भगत यांना ३ अपत्य असल्याने दोन्ही ग्रा.पं.सदस्याचे सदस्य मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ कलम १४ नुसार सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी याचिका अप्पर जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे दाखल करण्यात आली. दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद झाल्यानंतर दोन्ही ग्रा.पं.सदस्याचे सदस्यत्व रद्द केल्याचे निकाल अप्पर जिल्हाधिकारी यांनी २ जुलैला दिले. प्रेमदास चव्हाण यांच्याकडून अधिवक्ता पी.एन.चौधरी यांनी काम पाहिले तर गैरअर्जदाराकडून अभियोक्ता राजेश इंगोले यांनी काम पाहिले.