बचत गटाच्या महिलांचा गाव हगणदरी मुक्तीचा संकल्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 14:08 IST2017-08-16T14:08:20+5:302017-08-16T14:08:20+5:30

बचत गटाच्या महिलांचा गाव हगणदरी मुक्तीचा संकल्प!
मानोरा : प्रशासनाच्यावतिने गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. तरीही गाव हगणदरीमुक्त होण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. अशातच मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील २० बचत गटाया महिलांनी गाव हगणदारीमुक्तीचा संकल्प केला आहे. केवळ संकल्पच महिलांनी केला नसून ३१ आॅगस्टपर्यंत ते उदिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार केल्याने या महिलांचे परिसरात कौतूक केल्या जात आहे.
गावागावात अनेकांच्या घरी शौचालये असतांना ते उघडयावर जातात तर काही जण शौचालय बांधण्यास टाळाटाळ करतांना दिसून येत आहेत. गावातील नागरिकांनी गाव हगणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला यावेळी बचत गटाच्या महिला स्वताहून पुढे आल्यात व त्यांनी हा आगळा वेगळा संकल्प करुन एक आदर्श निर्माण केला आहे. कारखेडा येथे स्वच्छ भारत मिशनच्या अधिकाºयांनी भेटी दिल्यात, नागरिकांना स्वच्छतेचे महत्व कळविले तरीही हगणदारी पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नसल्याने महिलांची सभा घेतली. यावेळी बचत गटातील महिलाही सहभागी होत्या. अधिकाºयांनी केलेल्या मागदर्शनामुळे बचत गटातील महिलांनी पुढाकार घेवून सदर संकल्प घेतला व निर्धार व्यक्त केला.
यावेळी मिनी गटविकास अधिकारी एम.एल. वाघमारे, विस्तार अधिकारी बेलखेडकर, सरपंच भानु जाधव, कार्लीचे सरपंच दत्ता तायडे, ग्रामसेवक एकनाथ चिकटे, कार्लीचे ग्रामसेवक आडे, तळप बु. ग्रामसेवक सोनटक्के, माविम सहयोगीनी माधुरी कांबळे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने या महिलांचे कौतूक केले. यावेळी वीसही महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव तथा सदस्यांची उपस्थिती लाभली होती.