मोटारसायकलच्या डिक्कीतून एक लाख रुपये पळविले!
By Admin | Updated: August 15, 2015 00:30 IST2015-08-15T00:30:34+5:302015-08-15T00:30:34+5:30
वाशिम येथील रिसोड नाका परिसरातील घटना.
_ns.jpg)
मोटारसायकलच्या डिक्कीतून एक लाख रुपये पळविले!
वाशिम : मोटारसायकलच्या डिक्कीमधून एका शेतकर्याचे एक लाख रूपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना जुना रिसोड नाका परिसरात १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३0 वाजताच्या सुमारास घडली. वाशिम तालुक्यातील झाकलवाडी येथील मदन विश्वनाथ काळबांडे या इसमाने युनियन बँकेमधून एक लाख रूपये ह्यविड्रॉलह्ण केले होते. सदर रक्कम त्यांनी मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवली व जुना रिसोड नाका परिसरात मोटारसायकल उभी करून मित्राला भेटायला गेला. नेमकी हीच संधी हेरून अज्ञात चोरट्यांनी डिक्कीमधील एक लाख रूपये लंपास केले. काळबांडे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.