केकतउमरा ग्रा.पं.ला कारणे दाखवा नोटिस!
By Admin | Updated: July 5, 2017 01:16 IST2017-07-05T01:16:21+5:302017-07-05T01:16:21+5:30
शाहू महाराज जयंतीचा पडला विसर

केकतउमरा ग्रा.पं.ला कारणे दाखवा नोटिस!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथील ग्रामपंचायतने आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला नाही. ही गंभीर बाब हेरुन प्रवीण पट्टेबहादुर यांनी वाशिम पंचायत समितीला २८ जून रोजी तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत पंचायत समितीने ग्रामपंचायतीला १ जुलै रोजी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
फुले, शाहू, आंबेडकर परिवर्तन पॅनल तयार करून विद्यमान सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतची निवडणूक लढली. त्याच लोकांना २६ जून या शाहू महाराज यांच्या जयंतीचा विसर पडणे, ही शोकांतिका आहे, असे पट्टेबहादूर यांनी निवेदनात नमूद केले. त्याची दखल घेऊन वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती आदींच्या स्वाक्षरीनिशी केकतउमरा ग्रामपंचायतला १ जुलै रोजी कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली. त्यात म्हटले आहे, की शाहू महाराजांची जयंती साजरी का केली नाही, याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करावा; अन्यथा कार्यवाही केली जाईल, असे नोटिसमध्ये बजावण्यात आले आहे.