जिल्ह्यातील अवैध गतिरोधक हटविले जाणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 20:02 IST2017-10-10T20:01:18+5:302017-10-10T20:02:46+5:30

वाशिम : जिल्ह्यात विविध मार्गावर अवैधरीत्या व चुकीच्या पध्दतीने गतिरोधक तयार करण्यात आले असून त्याचा वाहनधारक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्त्यावरील अवैध गतिरोधक हटविण्यात यावे, असा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीने घेतला.  वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे ही कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.

Invalid speedbreaker in the district will be deleted! | जिल्ह्यातील अवैध गतिरोधक हटविले जाणार !

जिल्ह्यातील अवैध गतिरोधक हटविले जाणार !

ठळक मुद्देजिल्हाधिका-यांच्या बांधकाम विभागाला सूचना रस्ता सुरक्षा समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात विविध मार्गावर अवैधरीत्या व चुकीच्या पध्दतीने गतिरोधक तयार करण्यात आले असून त्याचा वाहनधारक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्त्यावरील अवैध गतिरोधक हटविण्यात यावे, असा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीने घेतला.  वाहतूक पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे ही कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, वाहतूक पोलीस शाखेचे जामकर आदी उपस्थित होते. अवैध गतिरोधक हटविण्याबरोबरच ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, अशा ठिकाणी गतिरोधक निर्मिती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिल्या. रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने अवैध प्रवासी वाहतूक,  रस्त्यावरील अतिक्रमणे, नो-पार्किंग झोन, जड वाहनास शहरात प्रवेशबंदी, इलेक्ट्रॉनिक सिग्नल, मोकाट जनावरांचा बंदोबस्त आदी विषयांवर रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Web Title: Invalid speedbreaker in the district will be deleted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.