पानपट्टी फोडून ५२ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 19:36 IST2017-07-31T19:35:24+5:302017-07-31T19:36:58+5:30
मालेगाव (वाशिम): मालेगाव-मेहकर राज्य महामार्गावरील वडपजवळील टोल नाक्याजवळील पानपट्टी फोडुन ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३० जुलैच्या रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली .

पानपट्टी फोडून ५२ हजारांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): मालेगाव-मेहकर राज्य महामार्गावरील वडपजवळील टोल नाक्याजवळील पानपट्टी फोडुन ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३० जुलैच्या रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली .
मालेगाव शहरात सेवा सोसायटी समोर राहणाºया गजानन रुस्तम अंभोरे यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या टोल नाक्याजवळील पानपट्टी व इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाचा दरवाजा तोडून १ इन्व्हर्टर बॅटरी, दोन निळे गॅस सिलेंडर, ३५ मोबाईल चार्र्जर व २५ मेमरी कार्ड, पाच हजार रुपये किंमतीचे इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण ५२ हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवी कलम ४६१, ३८० नुसार गुन्ह्याची नोंद केली.