Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना

By सचिन सागरे | Published: May 2, 2024 03:13 PM2024-05-02T15:13:18+5:302024-05-02T15:13:32+5:30

Thane News: ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघ घोषित करण्यात आला.

Thane District Dodgeball Senior Team left for Beed for State Tournament | Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना

Thane: ठाणे जिल्हा डॉजबॉल वरिष्ठ संघ राज्य स्पर्धेसाठी बीडला रवाना

- सचिन सागरे  
कल्याण  - ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघ घोषित करण्यात आला. या निवडलेल्या संघाचे शिबिर १० ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान नानासाहेब धर्माधिकारी क्रीडांगण येथे कार्यवाह सदाशिव पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली, आंतरराष्ट्रीय खेळाडू निशांत गायकवाड, रोहित भालेराव, राष्ट्रीय खेळाडू गौरव मोहारे, प्रतिक मुरकुटे तसेच लता पाचपोर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.

बीड येथे ३ ते ५ मे २०२४ दरम्यान डॉजबॉल राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या शिबिराच्या समारोप प्रसंगी ठाणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशन अध्यक्ष अंकुर आहेर, सचिव सदाशिव पाचपोर, बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद अध्यक्ष डॉ. अशोक बहिरव आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२४ स्पर्धेत सहभागी होणारा ठाणे जिल्हा संघ पुढीलप्रमाणे -

महिला संघ - किमया अहिरे (कर्णधार), दिया करपे (उपकर्णधार), गायत्री आव्हाड, वैष्णवी तिवारी, तेजस्विनी बाऊस्कर, अंशिका शहा, अनुष्का तोमर, माही पावस्कर, श्रेया शर्मा, नम्रता राठोड, प्रथा भोईर, संजित साक्रे, साक्षी पावस्कर (व्यवस्थापक), गौरव मोहाचे (प्रशिक्षक).

 पुरुष संघ - साहिल परदेशी (कर्णधार), रेहान तांबोळी (उपकर्णधार), गौरव भालेराव, संचित काळे, तनिष अदमाने, स्वराज निकम, प्रतिक मुरकुटे, रोहन गंगावणे, साहिल घोलप, ध्रुव पांड्ये, निशांत गायकवाड, जीत सैनी, अनुज मोरे (व्यवस्थापक), रोहित भालेराव (प्रशिक्षक).

Web Title: Thane District Dodgeball Senior Team left for Beed for State Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे