अडीच लाखांचा ऐवज चोरीला

By Admin | Updated: November 23, 2015 02:05 IST2015-11-23T02:05:26+5:302015-11-23T02:05:26+5:30

शहरात नौपाडा व वर्तकनगर परिसरांत चार चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात दोन खाजगी कंपन्यांची कार्यालये फोडून लाखोंची रोकड चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Stolen two and a half lakh's worth | अडीच लाखांचा ऐवज चोरीला

अडीच लाखांचा ऐवज चोरीला

ठाणे : शहरात नौपाडा व वर्तकनगर परिसरांत चार चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात दोन खाजगी कंपन्यांची कार्यालये फोडून लाखोंची रोकड चोरल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे, नौपाडा परिसरात पोखरन रोड येथे राहणारे संदीप अग्रवाल (४३) यांचे श्री कृपा चेंबरमधील स्वस्तिक फ्रेट मूव्हर्स प्रायव्हेट लि. कार्यालय चोरट्यांनी फोडून ४८ हजार रोख रक्कम चोरली. तसेच वृंदावन साहू यांचेदेखील त्याच ठिकाणी एनआयएफएस इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट नावाचे कार्यालय चोरट्यांनी लॉक तोडून रोख ९० हजारांसह ३० हजारांचा लॅपटॉप व १२ हजारांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मशीन चोरून नेली. तिसऱ्या घटनेत पार्वती सदन येथील चैतन्य सत्रा यांची दुचाकी चोरीला गेली. चौथ्या घटनेत, इंदिरानगर येथील प्रशांत पगारे यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे घुसून तीन विविध ५५ हजारांचे फोन चोरट्यांनी लंपास केले.

Web Title: Stolen two and a half lakh's worth