ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडला गणितज्ञ रामानुजन यांचा 'एक सात दो नौ' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 04:25 PM2019-03-04T16:25:46+5:302019-03-04T16:29:14+5:30

अभिनय कट्टा म्हणजे प्रबोधनाच एक यशस्वी माध्यम. आजवर अनेक साहित्यिक अनेक कलाकारांच्या कलाकृती येथे सादर झाल्या आणि त्यातून सामाजिक प्रबोधनही झाले.

Ramanujan's 'One Seven Two Nine' | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडला गणितज्ञ रामानुजन यांचा 'एक सात दो नौ' 

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडला गणितज्ञ रामानुजन यांचा 'एक सात दो नौ' 

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर उलगडला गणितज्ञ रामानुजन यांचा 'एक सात दो नौ' अभिनय कट्टा म्हणजे प्रबोधनाच एक यशस्वी माध्यम 'एक सात दो नौ' ही गणिताच एक गुपित उलगडणारी हिंदी एकांकिका

ठाणे : 'एक सात दो नौ' (१७२९)* ही रामानुजन ह्यांनी सांख्यिकीशास्त्राला उलगडवून सांगितलेली चमत्कारिक संख्या. गणितज्ञ हार्डी ह्यांनी एका टॅक्सी चा नंबर पाहिला १७२९ ते रामानुजन ह्यांना म्हणाले की किती व्यर्थ वाटते ही संख्या त्यावर आजारी अवस्थेतही रामानुजन ह्यांनी त्या संख्येची विशेषता उलगडवून सांगितली की *१७२९ ही एकमेव संख्या आहे जिच्या दोन जोड्या आहेत दोन संख्यांच्या घणाच्या बेरजेच्या.म्हणजे 1चा आणि 12 च्या घनांची आणि 10 आणि 9 च्या घनांची बेरीज १७२९ च येते. अभिनय कट्टा क्रमांक ४१८ हाही गणिताची गोडी असणाऱ्या काहीतरी नवीन शिकू पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच होता.

     गणित स्वयंसेवक संघ प्रस्तुत 'एक सात दो नौ' ही गणिताच एक गुपित उलगडणारी हिंदी एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर झाली. गणित स्वयंसेवक संघ हा सतत ८-९ वर्ष मुंबई आणि जवळपासच्या सरकारी शाळांमध्ये जाऊन त्या मुलांमध्ये शिक्षणाची आणि विशेषतः गणिताची भीती पळवून त्याविषयी गोडी निर्माण व्हावी ह्यासाठी कार्यरत आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी गणितात कुशल व्हावे हाच ह्या संघाचा प्रयत्न आहे.त्यांच्याच प्रयत्नातून अशाच शाळेतील मुलांना घेऊन त्यांनी '१७२९' ही हिंदी एकांकिका बसवली आहे. एका खुनाच्या तपासाची ही गूढ कहाणी आहे.आणि हे गूढ उलगडण्यासाठी १७२९ ह्या रामानुजन ह्या संख्येचा कसा काय उपयोग होतो ह्याचा प्रवास म्हणजे ही एकांकिका. सदर एकांकिकेचे लेखन रुचिरा पिंगुळकर, श्रुती शेट्टी ,नृपल सचिन ह्यांनी केले आहे.व ह्याचे दिग्दर्शन रुचिरा पिंगुळकर ह्यांनी केले आहे.सदार एकांकिकेत स्नेघा अर्जुन,कोमल साव, मुन्नी यादव, समीक्षा शर्मा,रॉकी साव,नदीम हंसारी, शशांक गुप्ता,मन्सूर हुसेन,मॉली महेश्वरी ह्या बालकलाकारांनी सहभाग घेतला.सदर एकांकिकेचे नेपथ्य श्रुती शेट्टी, संगीत संयोजन अभिलेश आणि श्रीजिथ नायर, प्रकाश योजना शांताराम भगत ,वेशभूषा निकिता प्रभू ,रंगभूषा शशिकांत सकपाळ आणि देवश्री लागवनकर,आणि तांत्रिक जबाबदारी खुशबू शाह,देविना निकम ह्यांनी तर रंगमंच व्यवस्था मयूर अंकोलेकर, मरियाम फैझी, राधिका अग्रवाल ह्यांनी सांभाळली. अभिनय कट्ट्यावर एकांकिका सादर करण्याची संधी दिल्याबद्दल गणित स्वयंसेवक संघाने अभिनय कट्ट्याचे आभार मानले.सामान्य मुलांमधील गणिताची भीती कमी करून मनोरंजनातून गणिताची आवड निर्माण करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचेल असे मत गणित स्वयंसेवक संघाने व्यक्त केले.अभिनय कट्टा नेहमीच अशा वैचारिक आणि प्रबोधनात्मक कलाकृतींना प्रोत्साहन देत आला आहे.गणिताचे तत्वज्ञान खूपच रंजकरित्या तेही ह्या बालकलाकारांच्या निरागस अभिनयासोबत सादर केल्याने १७२९ प्रेक्षकांच्या बुद्धिप्रमाणे मनातही कायमचा टिकून राहील आणि ह्या प्रकल्पात काही मदत लागली तर अभिनय कट्टा नेहमी तुमच्या सोबत असेल असे आश्वासन अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष श्री किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

        कट्टा क्रमांक ४१८ ची सुरुवात प्रेक्षक प्रतिनिधी आशा राजदेरकर ह्यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली. *अभिनय कट्ट्याचे कलाकार सहदेव साळकर ह्याने 'आसिफ' ,अभय पवार ह्याने 'यारो मुझे माफ करना',उत्तम ठाकूर ह्यांनी 'कडक इंस्पेक्टर',शुभांगी भालेकर ह्यांनी 'अडगळ' ह्या एकपात्रीचे सादरीकरण केले. सादर अभिनय कट्ट्याचे निवेदन अभिनय कट्ट्याचा कलाकार कुंदन भोसले ह्याने केले*.

Web Title: Ramanujan's 'One Seven Two Nine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.