ठाण्यातील संगीत कट्टयावर बालसुरांच्या मैफिलचे सादरीकरण, बहारदार नृत्यांचे सादरीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 03:40 PM2018-12-29T15:40:08+5:302018-12-29T15:41:57+5:30

संगीत कट्टयावर बालसुरांच्या मैफिलचे, बहारदार नृत्यांचे सादरीकरण झाले. 

Presentation of Balasur's concert on Thane Music Casting, Presentation of Outstanding Dances | ठाण्यातील संगीत कट्टयावर बालसुरांच्या मैफिलचे सादरीकरण, बहारदार नृत्यांचे सादरीकरण 

ठाण्यातील संगीत कट्टयावर बालसुरांच्या मैफिलचे सादरीकरण, बहारदार नृत्यांचे सादरीकरण 

Next
ठळक मुद्देसंगीत कट्टयावर बालसुरांच्या मैफिलचे सादरीकरण"ढोलीडा" या गाण्यावर नृत्य सादर संगीत कट्ट्यावरून अनेक कलाकार मिळण्याचं एक महत्त्वपूर्ण ठिकाण : नाकती

ठाणेसंगीत कट्ट्यावर बालसुरांची मैफिल या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात अभिनय कट्ट्याच्या बालसंस्कार शास्त्र मधील  कलाकारांनी सादरीकरण केले. यंदाचा हा ३० क्र. संगीत कट्टा होता. सुरेल गाण्यांसोबत अनेक वाद्यांचे तसेच बहारदार नृत्यांचे सादरीकरण यावेळी सादर झाले.

चिन्मय मोर्य याने "ढोलीडा" या गाण्यावर नृत्य सादर केले. मैत्रेय दिवाडकर याने हार्मोनिअम वर "भैरवी" रागाचे सादरीकरण केले. राज सिनलकर व कुणाल याने पियानो  आणि ऑकटोपॅडवर "सिम्बा" या चित्रपटातील "दिल धडकाये" या गाण्याचे सादरीकरण केले. तसेच आदेश लाटे याने "वेस्टर्न हिप हॉप" नृत्य सादर केले. तसेच काव्य कुऱ्हाडे याने कविता सादर केली. आकांक्षा व अक्षरा यांनी आईच मातृत्व स्पष्ट करणारी "एकटी एकटी घाबरलीस ना आई" हे गाणं गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. बाल कलाकारांसाठी अशा पद्धतीचे संगीतमय कार्यक्रम घडत आहेत हि खरच समाधानाची बाब आहे. या कार्यक्रमांमुळेच मुलांना नवनवीन सादरीकरण करण्याचे प्रोत्साहन मिळते असे एका जेष्ठ प्रेक्षकाने सांगितले. शरद भालेराव व प्रभावती भालेराव यांनी दिपप्रज्वलन केले तर निवेदन किरण नाकती यांनी केले.  मुलांतील कला गुणांना वाव मिळावा,त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता केवळ चार भींतीत अडकून न राहता ती लोकांसमोर यावी या उद्देशानेच संगीत कट्ट्याची स्थापना करण्यात आली. बालसुरांची मैफिल म्हणजेच भविष्यात संगीत कट्ट्यावरून संगीत क्षेत्रासाठी अनेक कलाकार मिळण्याचं एक महत्त्वपूर्ण ठिकाण असणार आहे. आज प्रत्येक जण वेगवेगळे क्लास लावून विविध कला शिकत असतो परंतु ती कला सादर करण्यासाठी व्यासपीठाची गरज असते आणि ती म्हणजे संगीत कट्टा होय असे किरण नाकती यांनी सांगितले.

Web Title: Presentation of Balasur's concert on Thane Music Casting, Presentation of Outstanding Dances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.