ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्याचे रजिस्टर फाडल्याप्रकरणी सीईओंचे आदेशासही धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 20:14 IST2018-09-28T20:08:05+5:302018-09-28T20:14:35+5:30
माध्यमिक शिक्षण विभगातील पत्रव्यवहाराची नोंद असलेल्या आवक - जावक रजिस्टर मधील काही पाने जून महिन्यात फाडून पत्रव्यवहारांचा पुरावा नष्ठ केला आहे. या घटनेची दखल घेऊन सीईओ यांनी समिती गठीत करून अहवाल मागितला. त्यानुसार संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई होणे अपेक्षित होते. पण शिक्षण विभागाकडून या घटनेची गांभीर्याने पाहिले जात नाही.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभगातील पत्रव्यवहार नोंद आवक जावक रजिस्टरची पाने फाडल्याची घटना घडलेली
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभगातील पत्रव्यवहार नोंद आवक जावक रजिस्टरची पाने फाडल्याची घटना घडलेली. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतरच्या प्राप्त अहवालानुसार संबंधीतांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यकार्यकारी (सीईओ) अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिले. मात्र या आदेशास केराची टोपली दाखवत अद्यापही पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला नाही . केवळ शोकाज नोटीस देऊन कारवाईचा फार्स केल्याचे बोलले जात आहे.
माध्यमिक शिक्षण विभगातील पत्रव्यवहाराची नोंद असलेल्या आवक - जावक रजिस्टर मधील काही पाने जून महिन्यात फाडून पत्रव्यवहारांचा पुरावा नष्ठ केला आहे. या घटनेची दखल घेऊन सीईओ यांनी समिती गठीत करून अहवाल मागितला. त्यानुसार संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई होणे अपेक्षित होते. पण शिक्षण विभागाकडून या घटनेची गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे सीईओंचे आदेश असून ही त्याविरोधात पोलिसात गुन्हाही नोंदवण्यात आलेला नाही. याबाबत सीईओ यांना विचारले असता, चौकशी अहवाल समितीने दिला, असून शिक्षण विभागाला संबंधीतांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र अद्यापही पोलिसात गुन्हा नोंद केला जात नाही की कोणावर कारवाईचा बडगा उगारल्या जात नसल्याचे उघड झाले आहे. या गौंडबंगाला मागे कोणाचा कृपाशिर्वाद आहे. याविषयी प्रशासकीय पातळीवर तर्कवितर्क काढले जात आहे. याविषयी शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकत नाही.