गोर बोलीभाषेला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे - मोहन नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 06:45 PM2018-03-29T18:45:05+5:302018-03-29T18:45:05+5:30
बंजारी समाज हा कर्नाटक,आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात अश्या विविध प्रदेशात विखुरलेले आहे. परंतु तरीही या समाजाची भाषा एक आणि पेहराव एक आहे. या समाजातील साहित्य, संस्कृती ही मौखिक साहित्याच्या आधारांवर टिकून आहे.
डोंबिवली - बंजारी समाज हा कर्नाटक,आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात अश्या विविध प्रदेशात विखुरलेले आहे. परंतु तरीही या समाजाची भाषा एक आणि पेहराव एक आहे. या समाजातील साहित्य, संस्कृती ही मौखिक साहित्याच्या आधारांवर टिकून आहे. 125 अब्ज लोकसंख्येमध्ये 7 कोटी लोक हे बंजारी समाजाचे आहेत. त्यामुळे या भाषेला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा प्रख्यात साहित्यीक भीमणीपुत्र मोहन नाईक यांनी बोलताना व्यक्त केली.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्यातर्फे पाचवे अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटयगृहात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष नाईक हे होते. संमेलनाध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली. या संमेलनात राज्यासह देशातील अनेक भागातून गोर बंजारा समाज बांधव एकत्रित आले आहे. आजपासून सुरु झालेले हे अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलन दोन दिवस चालणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गोरबंजारा समाज एकत्रित आला आहे. समाजाची संस्कृती, परंपरा यांचे सवंर्धन करणो या साहित्य संमेलनामागील उद्देश आहे. त्याचबरोबर गोरबंजारा बोलीभाषा टिकली पाहीजे. बंजारा समाजातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. याशिवाय गोरबंजारा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सोयी सुविधा सरकारकडून मिळाल्या पाहिजेत. समाजाच्या उत्थानासाठी काय केले पाहिजे या विविध विषयावर आजपासून सुरु झालेल्या दोन दिवसी साहित्य संमेलनात मान्यवर चर्चा करणार आहे. संमेलनानिमित्त डोंबिवली दिंडी काढण्यात आली. यावेळी गोरबंजारा समाजबांधव पारंपारिक वेशभूषा परिधान करुन सहभागी झाले होते. यावेळी संमेलन स्वागताध्यक्ष शंकर पवार, संयोजक सुखलाल चव्हाण, आयकर विभागाचे अपर आयुक्त जीवनलाल लावडीया, मारोती राठोड, बी.जी. पवार, रूपेश चव्हाण, अखिल भारतीय सेवा संघ अध्यक्ष राजूसिंग राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, प्रदीप नाईक, कल्याण नायक भिमराव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
नाईक म्हणाले, या भाषेला दर्जा मिळाला पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या संविधानात गोर बंजारी बोलीभाषेसाठी घटना दुरूस्ती झाली पाहिजे. तसेच या समाजाच्या इतिहास लुप्त पावत आहेत. या समाजाचे अस्तित्व टिकावे यासाठी साहित्य प्रगल्भ झाले पाहिजे. बंजारा समाजाची संस्कृती ही जागतिक दर्जाची संस्कृती आहे. ही संस्कृ ती लोप पावू नये. शब्दांची वारंवार उत्क्रांती व्हावी, असे ही ते म्हणाले.
वास्तववाद, स्वचछंदतावाद, अभिजातवाद यांची तंडय़ातून निर्मिती झाली आहे. बौध्दीक चळवळ म्हणून ही गणली जाते. या संस्कृतीत मानवतावाद , बंधुत्व दिसून येतो. संस्कृतीत समानता दिसून येते. स्वातंत्र्य भारतात बंजारा समाज उपेक्षित आहे. राज्यघटनेनुसार त्यांना हक्क मिळाला नाही. हा समाज कष्टकरी आहे. तंडय़ात वसलेले समाज आहे. ब्रिटीशकाळात या समाजाचा मुख्य व्यवसाय रसद पुरविणो हा होता. ब्रिटीश सरकारच्या काळात हा व्यवसाय ठप्प झाला. हा समाज शहरापासून दूर आहे. तो केवळ जंगलात आणि तंडयात राहतो. या समाजाचे साहित्य हे मौखिक परंपरेतून पुढच्या पिढीकडे हस्तातंरीत होत आहे. पण या समाजातील महिलांही लेखणीचा वापर करतील. हा समाज शोषणमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. यात बंजारी समाजाचे बांधव एकत्रित आले होते. या दिंडीला गणोश मंदिरापासून प्रारंभ झाला. त्यानंतर बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, चार रस्ता, फडके रोड, क्रीडासंकुल या मार्गे फिरून सावित्रीबाई फुले नाटयगृहाजवळ तिचा समारोप झाला.