अनुपस्थित असूनही डॉक्टरची सही : चक्क रूग्णांच्या जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:19 IST2018-02-12T01:18:52+5:302018-02-12T01:19:05+5:30
डॉक्टरांच्या अनुपस्थितीत चक्क औषध निर्माण अधिकारी रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चालत असल्याचे उघड झाले आहे.

अनुपस्थित असूनही डॉक्टरची सही : चक्क रूग्णांच्या जीवाशी खेळ
मीरा रोड : डॉक्टरांच्या अनुपस्थितीत चक्क औषध निर्माण अधिकारी रुग्णांची तपासणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार मीरा- भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चालत असल्याचे उघड झाले आहे. गंभीर बाब म्हणजे डॉक्टर रजेवर असतानाही त्या दिवशी ते हजर असल्याची स्वाक्षरी करून पगार लाटत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भार्इंदर पूर्वेला पालिकेच्या नवघर शाळेतील आरोग्य केंद्रात डॉ. बी. डी. चकोर यांची नियुक्ती झाली आहे. या केंद्रात तपासणी व उपचारासाठी सुमारे शंभरच्या घरात रूग्ण रोज येतात. ७ फेब्रुवारीला डॉ. चकोर हे रजेवर होते. पण डॉ. रजेवर असताना त्या ठिकाणी अन्य पर्यायी डॉक्टर दिला जात नसल्याने औषध निर्माण अधिकारी स्वप्नील देव हेच चक्क डॉक्टरांच्या खुर्चीत बसून रुग्णांना आजारपणाबद्दल विचारुन औषध देत होते. त्यांना डॉक्टर कुठे आहेत या बद्दल विचारले असता ते व्यक्तीगत कारणांनी रजेवर असल्याचे सांगत होते.
प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनाही डॉ. चकोर उपस्थित नसल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी देखील ते व्यक्तीगत कारणांनी रजेवर असल्याचे सांंगितले.
एकीकडे पालिकेच्या आरोग्य केंद्रात येणाºया गोरगरीब गरजू रुग्णांना तपासण्यासाठी पर्यायी डॉक्टर नाही. त्यातही डॉक्टरांच्या गैरहजेरीत चक्क औषध निर्माण अधिकारी रुग्णांना औषधे देत आहेत. बहुतांश आरोग्य केंद्रां मध्ये देखील स्थिती वेगळी नाही.
याआधी पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात देखील डॉक्टर जागेवर नसल्याने वेळीच उपचाराअभावी एका तरुणीचा मृत्यू झाला होता. डॉक्टर जागेवर नसताना पर्यायी व्यवस्था न देतानाच आरोग्य केंद्र चालवली जात आहेत. त्यामुळे उपचारासाठी येणाºया नगरिकांना जीव धोक्यात घालूनच उपचार घ्यावे लागतात.
एकीकडे डॉक्टर रजेवर असताना त्यांच्या हजेरी पुस्तिकेत चक्क ते हजर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रातील हजेरी पत्रकात आपला खाडा दाखवल्यास पगार चुकेल म्हणून ही शक्कल लढवली गेल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेतील बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये असाच प्रकार चालत असून कुणाला कुणाचा मागमूस राहिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
कारवाईकडे लक्ष -
आरोग्य केंद्रात अशी परिस्थीती असल्याने तेथे येणाºया रूग्णांची हेळसांड होते.
या संदर्भात पालिका आयुक्त बी.जी.पवार कुठली कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या बाहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये हे असलेच प्रकार सुरू आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. बेजबाबदार अधिकारी फुकटचा पगार लाटण्यासाठी कामावर हजर नसताना हजेरीपत्रकावर सहया करतात. सखोल चौकशी करुन कारवाई आवश्यक आहे.
- सुलतान पटेल, अध्यक्ष, जगदंब प्रतिष्ठान